नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात (Union budget 2021) पश्चिम बंगालला झुकते माप दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता- सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ( Mamata Banerjee on Modi govt budget 2021)
या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. आम्हाला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. ‘मा, माटी, मानुष’ याच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पुन्हा निवडून येईल. भाजप हा केवळ गॅसचा फुगा आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
No need to worry, Maa, Mati, Manush’s (TMC) government is coming back to power. BJP is a gas balloon: West Bengal Chief Minister Mamata Banerjee pic.twitter.com/jCe9yDGA0x
— ANI (@ANI) February 1, 2021
पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा करण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या चारही राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच केंद्र सरकारने या घोषणा केल्याची चर्चा आहे.
तामिळनाडूत 1.03 लाख कोटींचा नॅशनल हायवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यातच इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्यात येणार आहे. केरळमध्ये 65 हजार कोटी रुपयांचे नॅशनल हायवे निर्माण करण्यात येणार आहेत. यावेळी मुंबई-कन्याकुमारी इकनॉमिक कॉरिडोअरचीही घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता- सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आसाममध्ये येत्या तीन वर्षात हायवे आणि इकनॉमिक कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी यावेळी केली.
यावेळी रेल्वे आणि मेट्रोसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 तयार करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. रेल्वेसाठी 1.10 लाख कोटींचं बजेट करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मेट्रो लाइट आणण्यावरही भर देण्यात आला आहे. कोच्ची, बेंगळुरू, चेन्नई, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्प तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
बजेटमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. पण मी म्हणालो हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबतीत तसंच काही राज्यातल्या निवडणूक आहेत योगायोगानs निधीची तरतूद अधिक दिल्यासारखे वाटत असल्याची टिप्पणी शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
संबंधित बातम्या:
Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार
मोठी बातमी! मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार