नवी दिल्ली | 30 January 2024 : देशाची वित्तंबातमी 1 फेब्रुवारी 2024 रोजी तुम्हाला जाणून घेता येईल. देशाचा अर्थमहोत्सव साजरा होणार आहे. देशाचे आर्थिक आरोग्य कसे आहे, ते तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या उपाय योजना करण्यात येणार आहे. देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना काळानंतर देशातील डिजिटल बजेटची सुरुवात झाली. पेपरलेस बजेटची प्रथा सुरु झाली आहे. हे बजेट तुम्हाला कुठे पाहता येईल? जाणून घ्या इत्यंभूत माहिती..
संसदीय अधिवेशन 31 जानेवारीपासून
बजेट सेशनची सुरुवात 31 जानेवारीपासून होईल. बजेट सेशनचे पहिले सत्र 9 फेब्रुवारीपर्यंत चालेल. बजेट सेशनच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेला उद्देशून भाषण करतील. बजेट सत्राची सुरुवात होईल. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्व्हे सादर होईल. आर्थिक सर्व्हे संक्षिप्त असेल.
11 वाजता सादर होईल बजेट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता लोकसभेत केंद्रीय बजेट 2024 सादर करतील. 1999 पासून केंद्रीय अर्थसंकल्प दुपारी 11 वाजता सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे. यापूर्वी ते संध्याकाळी 5 वाजता सादर करण्यात येत होते. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर केले होते. तेव्हापासू अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे.
मोबाईल ऐपवर उपलब्ध
संसदेत केंद्रीय बजेटचे भाषण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना हे भाषण आणि दस्तावेज केंद्रीय बजट मोबाईल एपवर उपलब्ध होईल. इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत, अँड्राईड आणि आईओएस या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर ते उपलब्ध करुन देण्यात येईल. तुम्ही हे एप www.indiabudget.gov.in येथून डाऊनलोड करु शकता.
येथे Budget Live