नवी दिल्ली | 2 February 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केले. बजेट भाषणात वित्तीय तूट, सरकारी कर्ज आणि भांडवली खर्च असे शब्द तुम्ही ऐकले असेल. यामधील आकडेवारी सकारात्मक आहे. तर पायाभूत सुविधांवर सरकार फोकस करत आहे. यामुळे लवकरच व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी वित्तीय तूट कमी करुन 5.1 टक्के ठेवण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. सध्याच्या आर्थिक वर्षासाठी 5.9 टक्क्यांहून हा आकडा 5.8 करण्याचा प्रयत्न आहे. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात जागतिक पतमानांकन (रेटिंग)संस्थांनी पण वित्तीय तोटा भरुन काढण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
किती आहे वित्तीय तूट
देशाची वित्तीय तूट 17 लाख 34 हजार 773 कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये तो कमी होऊन 16 लाख 85 हजार 494 कोटी रुपये करण्याचे लक्ष ठेवले आहे. बजेटच्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सरकारी उधारी कमी करण्यावर जोर दिला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. येत्या काळात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कर सकंलन वाढल्याने, बँका आणि आर्थिक संस्थांकडून होणाऱ्या फायद्याच्या आधारे वित्तीय तूट भरुन काढण्यात येणार आहे. जागतिक पतमानांकन संस्था फीच, एसअँडपी, मूडीजने भारताला अनुकूल रेटिंग दिले आहे.
ईएमआय असा होईल कमी?