नवी दिल्ली | 24 January 2024 : 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेट सादर होईल. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने मतदारांना लुभावणाऱ्या योजनांचा पेटारा उघडेल, असे मानण्यात येत आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने विविध योजनांसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. यंदा पण अशाच धमाक्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यंदा रेल्वेवर अधिक फोकस करण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,40,000 कोटी रुपये देण्यात आले होते. या बजेटमध्ये रेल्वेच्या विकासावर 20 टक्के अधिक रक्कम खर्च होईल. त्यामुळे यंदा रेल्वेला मोठी झेप घेण्यासाठी 3 लाख कोटी रुपयांची लॉटरी लागू शकते. अशावेळी गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होऊ शकतो.
रेल्वे इन्फ्रावर फोकस
मोदी सरकार रेल्वेच्या पायाभूत सोयी-सुविधांसह आधुनिकीकरणावर अधिक फोकस करत आहे. या एकाच वर्षात वंदे भारत ट्रेनने रेल्वेविषयीचे सर्व चित्रच पालटून टाकले आहे. वंदे भारतने वेळेची मोठी बचत होत असल्याने अनेक राज्यांनी तिची मागणी केली आहे. केंद्र सरकारने 500 पेक्षा जास्त ट्रेन हायटेक करण्याचा विडा उचलला आहे. यावर्षात हा बदल प्रवाशी अनुभव शकता. त्यातच बुलेट ट्रेन धावली तर भारतीय रेल्वे कात टाकल्याशिवाय राहणार नाही. अयोध्या, भोपाळ, विशाखापट्टनम, वाराणशी आणि इतर काही स्टेशन हायटेक करण्यात येत आहेत. या स्टेशनवर एअरपोर्टसारख्या सुविधा मिळणार आहे.
मिशन झिरो
केंद्र सरकार यंदाच्या बजेटमध्ये मिशन झिरोवर लक्ष केंद्रीत करणार आहे. रेल्वेच्या अपघाताने देशाला हदरवले आहे. त्यामुळे झिरो अपघात धोरण राबविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्यासाठी बजेटमध्ये मोठ्या खर्चाची तरतूद करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरक्षेसाठी केंद्राने 11000 कोटींची तरतूद केली आहे.
या कंपन्यांना होणार फायदा