नवी दिल्लीः शेअर बाजारात (SHARE MARKET) सध्या अनिश्चिततेचं सावट आहे. गुंतवणुकदारांतील चलबिचल शेअर बाजाराच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स मध्ये 1141 अंकाची(1.95%)घसरण नोंदविली गेली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं आहे. भारतीय शेअर बाजारात घसरणीला मुख्यत्वे परकीय गुंतवणुकदारांचा (FOREGIN INVESTMENT) सर्वाधिक सहभाग आहे. सलग सातव्या महिना परकीय पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत एकूण 12300 कोटी रुपयांचं भांडवल काढून घेण्यात आलं. गेल्या चार महिन्यात एफपीआयच्या माध्यमातून 1.22 लाख कोटी मूल्याच्या शेअर्सची विक्री (SHARES BUYING) करण्यात आली आहे.
परकीय गुंतवणुकदारांवर सर्वात मोठा परिणाम अमेरिका फेडरल रिझर्व्हचा होत असल्याचं चित्र आहे. फेडरल रिझर्व्ह व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. येत्या 28 एप्रिलला अमेरिकेनं अर्थव्यवस्थेची माहिती समोर येणार आहे. फेडरल रिझर्व्ह महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याज दरांत फेररचनेचा निर्णय लवकरच अंमलात आणण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेतील महागाई गेल्या चार दशकातील सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
सलग सहा महिने विक्रीच्या सत्रानंतर परकीय शेअर गुंतवणूक दिसून आली होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 7,707 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यानंतर 11 ते 13 एप्रिल दरम्यान 4,500 कोटींची विक्री करण्यात आली. त्यानंतर सुरू असलेले शेअर बाजारातील विक्री सत्र अद्यापही कायम आहे.
• अमेरिका फेडरल रिझर्व्हचे व्याजदर फेररचनेचे संकेत
• रशिया-युक्रेन विवाद
• कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार
• महागाईचा उच्चांक
कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चव्हाण यांनी कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, वाढती महागाई, जीडीपी दरात वाढीचे संकेत यामुळे भविष्यात परकीय गुंतवणुकीचे प्रमाण कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. केवळ भारतच नव्हे जगातील अन्य भांडवली बाजारांना शेअर विक्रीचा सामना करावा लागतो आहे. एफपीआयमध्ये एप्रिल महिन्यात तैवान, दक्षिण कोरिया आणि फिलिपिन्स देशांत विक्रीचं सत्र दिसून आलं.
संबंधित बातम्या