केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीधारकांच्या महागाई भत्त्यात (DA-Dearness Allowance) तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एक जानेवारी 2022 पासूनच्या वेतनावर तीन टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister of India) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting Today) होणार आहे. या बैठकीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जर बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तर याचा फायदा देशातील तब्बल 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. सोबतच 68.62 निवृत्तीधारकांना देखील या निर्णयाचा लाभ होईल. शनिवारी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यापूर्वीच ही आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळू शकते. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीधारकांच्या डीएमध्ये वाढ करण्याबाबत मोठ्या घोषणेची शक्यता आहे. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. जर महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 34 टक्क्यांवर जाईल. यापूर्वीच तो 31 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यापूर्वीच मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चौव्हाण यांच्या नेतृत्वातील सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 31 टक्क्यांवर पोहोचला आहे. मध्य प्रदेश हे देशातील एकमेव असे राज्य आहे जिथे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्यांच्या मुळ वेतनाच्या 20 टक्के करण्यात आला आहे.
IPO बाजारात इतना सन्नाटा क्यू है भाई ? तीन महिन्यांत केवळ 4 कंपन्यांची एंट्री