नवी दिल्ली: कॅनरा बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना दिली आहे. अलीकडच्या काळातील वाढते सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कॅनरा बँक नेहमी ग्राहकांना जागृत करत असते. कॅनरा बँकेने त्यांच्या ग्राहकांना एटीएम कार्डशी संबंधित एक सेवा बंद करण्यास सांगितलं आहे. कॅनरा बँकेने त्यांच्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. (Canara Bank issue alert to its customers to stop international transactions of ATM cards)
कॅनरा बँकेने त्यांच्या ग्राहकांना एटीएमवरील आंतरराष्ट्रीय व्यवहार (International Transaction)ही सेवा बंद करण्यास सांगतिलं आहे. बँकेने ग्राहकांना ‘ प्रिय ग्राहक, कोणत्याही अनावश्यक बँक व्यवहारांपासून वाचण्यासाठी तुमच्या खात्यावरील मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम आणि बँकेतून करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय व्यापार बंद करा, असं म्हटलं आहे.’ ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार किंवा सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर परदेशातून होत असतात त्यामुळे कॅनरा बँकेने ग्राहकांना हे आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद केल्यास फसवणुकीचे प्रकार कमी होतील, असं बँकेचं मत आहे.
कॅनरा बँकेने ग्राहकांना ज्यावेळी आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे असतील त्यावेळी ते करु शकतात, असं म्हटलं आहे. ही सेवा आवश्यक असेल त्यावेळी पुन्हा सुरु करता येईल, यासाठी अधिक वेळ लागत नाही, असं देखील कॅनरा बँकेने कळवलं आहे.
सिंडीकेट बँकेचे आयएफएससी कोड बंद होणार
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सिंडीकेट बँक कॅनरा बँकेत विलीन करण्यात आली आहे. त्यामुळे सिंडीकेट बँकेचे आयएफएससी कोड 1 जुलैपासून बंद होणार आहेत. ग्राहकांनी नवे उपलब्ध करुन घेण्याचं आवाहन बँकेने केलं आहे.
Tauktae cyclone | महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा इतिहास, निर्मितीपासून नावाची कहाणीhttps://t.co/iDW2SHJNfj #TauktaeCyclone #CycloneTauktae #Maharashtra #taukate
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2021
संबंधित बातम्या:
SBI ग्राहकांसाठी अलर्ट! आताच अपडेट करा ही माहिती नाहीतर ATM होईल बंद
Bank Alert | 31 मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा बंद होईल बँक खाते, ‘या’ बँकेचे ग्राहकांना फर्मान!
( Canara Bank issue alert to its customers to stop international transactions of ATM cards)