संपत्ती तब्बल 1.76 लाख कोटी कॅश, कर्ज 4 लाख कोटी; प्रतिज्ञापत्रातून उमेदवाराची माहिती

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

चेन्नई: तुम्ही आत्तापर्यंत निवडणूक मैदानात उतरलेल्या अनेक उमेदवारांची संपत्ती वाचली असेल. त्यांच्या संपत्तीत जमीन, सोने आणि इतर संपत्ती असणे हे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र, संपत्ती म्हणून तब्बल 1.76 लाख कोटी रुपयांची कॅश आणि कर्ज म्हणून 4 लाख कोटींचा बोजा असल्याचे कोणी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे का? तामिळनाडूच्या पेरमबूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीला उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराने प्रतिज्ञापत्र […]

संपत्ती तब्बल 1.76 लाख कोटी कॅश, कर्ज 4 लाख कोटी; प्रतिज्ञापत्रातून उमेदवाराची माहिती
विम्याचा कालावधीः 1 जून ते 31 मे - वार्षिक प्रीमियम ऑटो डेबिट सुविधेद्वारे बँक खात्यातून वजा केले जाते. या चालू असलेल्या योजनांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी 31 मे 2021 पर्यंत त्यांच्या खात्यात पुरेसा शिल्लक ठेवला पाहिजे, जेणेकरून या योजनांचा लाभ कायम राहील.
Follow us on

चेन्नई: तुम्ही आत्तापर्यंत निवडणूक मैदानात उतरलेल्या अनेक उमेदवारांची संपत्ती वाचली असेल. त्यांच्या संपत्तीत जमीन, सोने आणि इतर संपत्ती असणे हे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र, संपत्ती म्हणून तब्बल 1.76 लाख कोटी रुपयांची कॅश आणि कर्ज म्हणून 4 लाख कोटींचा बोजा असल्याचे कोणी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे का? तामिळनाडूच्या पेरमबूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीला उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराने प्रतिज्ञापत्र सादर करत ही माहिती दिली आहे.

उमेदवार मोहनराज यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे तब्बल  1.76 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम असल्याचे सांगितले. हे जर खरे असेल तर ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरतील. मात्र, यात त्यांनी आपल्यावर 4 लाख कोटी रुपयांचे कर्जही असल्याचे म्हटले आहे. गंमत म्हणजे याची चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचेही समोर आले.

प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देण्याचे कारण

संबंधित उमेदवार मोहनराज निवृत्त पोलीस अधिकारी असून त्यांचे वडील हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी जेबामनी जनता पक्षाकडून आपली उमेदवारी दाखल केली आहे. 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी ही चुकीची माहिती दिली. ही माहिती अगदी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध आहे. मोहनराज यांना निवडणूक आयोगाला चुकीची माहिती देण्याचे कारण विचारले असता त्यांनी जे कारण सांगितले तेही तेवढेच वेगळे आहे. त्यांनी हे सर्व करण्यामागे काही महत्त्वाच्या विषयांकडे लोकांचे लक्ष वेधायचे होते म्हणून असे केल्याचे सांगितले.

तामिळनाडू सरकारची अकार्यक्षमता दाखवण्याचा उद्देश

मोहनराज यांनी सांगितले, ‘मला या माध्यमातून तामिळनाडू सरकारची प्रशासकीय अकार्यक्षमता उघड करायची होती. तामिळनाडूवर वर्ष 2020 पर्यंत 3.97 लाख कोटी रुपयांचे कर्ज होणार आहे. याची जबाबदारी सध्याच्या सरकारवर आहे.’ यासोबतच त्यांनी 2जी घोटाळ्यातील तपास योग्य पद्धतीने झालेला नसल्याचेही सांगत हेही कारण असल्याचे नमूद केले. अशाप्रकारे मोहनराज यांनी आपल्या चुकीच्या प्रतिज्ञापत्रातून एकाचवेळी अनेक मुद्दे उपस्थित केले आहे. हे मुद्दे उपस्थित करताना सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी वापरलेली ही शक्कलही देशभरात चर्चेला विषय ठरत आहे. चुकीची माहिती दिल्याने आता निवडणूक आयोग त्यांच्यावर काय कारवाई करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. मात्र, त्यांनी ज्यासाठी ही चूक केली तो उद्देश मात्र सफल झाल्याचे दिसत आहे.