झुकेगा नही मैं, शेअर बाजारातील या ‘पुष्पा’वर गुंतवणूकदार फिदा, दोन शेअरचा नुसता धुमाकूळ, 52 आठवड्यात नाही हटले मागे

| Updated on: Dec 05, 2024 | 3:25 PM

Share Market Pushpa Stocks : देशात सध्या महाराष्ट्र आणि झारखंड येथे नवीन सरकारचा शपथविधी, तर दुसरीकडे पुष्पा चित्रपटाची चर्चा सुरू आहे. त्यातच शेअर बाजारात हे दोन स्टॉक पुष्पा ठरले आहेत. या दोन शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. 52 आठवड्यात या शेअरने जोरदार कामगिरी बजावली आहे.

झुकेगा नही मैं, शेअर बाजारातील या पुष्पावर गुंतवणूकदार फिदा, दोन शेअरचा नुसता धुमाकूळ, 52 आठवड्यात नाही हटले मागे
शेअर बाजारातील 'पुष्पा'
Follow us on

भारतीय शेअर बाजाराने या आठवड्यात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. बाजारात तेजीचे सत्र आहे. या आठवड्याच्या चौथ्या दिवसी गुरूवारी तेजीचे वातावरण दिसले. या दरम्यान काही शेअर्सनी गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकाला गवसणी घातली आहे. यामध्ये सेंट्रल डिपॉझटरी सर्व्हिसेज लिमिटेड (CDSL) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या दोन स्टॉकचा पण समावेश आहे. गुरूवारी हे दोन्ही शेअर खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजीचे वातावरण आहे. सेन्सेक्सला पुन्हा एकदा बहर आला आहे. Sensex ने पुन्हा एकदा 81 हजार अंकाचा टप्पा ओलांडला आहे.

दोन्ही शेअरची कशी कामगिरी?

CDSL चा शेअर गुरुवारी 5 डिसेंबर रोजी 10 टक्क्यांपर्यंत उसळला. या दरम्यान कंपनीचा शेअर 1865.4 च्या उच्चांकावर पोहचला. गेल्या महिन्यात आतापर्यंत स्टॉक 19 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. तर बीएसईच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर 5168.9 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहचला आहे. गेल्या एका महिन्यात बीएसईच्या शेअरमध्ये आतापर्यंत 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर वर्ष 2024 मध्ये बीएसईच्या शेअरने 128 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

मोतीलाल ओसवालच्या शेअरची काय स्थिती?

गुरूवारी मोतीलाल ओसवाल फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसली. या शेअरने 1016 रुपयांचा इंट्राडे उच्चांक गाठला. तर तो 1064 रुपयांच्या उच्चांकाजवळ आहे. गेल्या एका महिन्यात मोतीलाल ओसवालच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. एंजल वनच्या पण शेअरमध्ये गुरुवारी 3.5 टक्क्यांची वाढ दिसली. गेल्या एका महिन्यात हा शेअर 8 टक्क्यांनी वधारला आहे. तरीही अजून हा शेअर त्याच्या 3896 या उच्चांकी कारभारापासून 20 टक्के दूर आहे.

शेअर बाजारात तेजीचे सत्र

शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी आली आहे. या आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सेन्सेक्सने दुपारी 2 वाजता 1250 अंकांपर्यंत उसळी घेतली. आज सेन्सेक्सने 82 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टी आज जवळपास 400 अंकांनी उसळला. निफ्टी पुन्हा एकदा 25 हजार अंकांच्या जवळपास पोहचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारावर घसरणीचे सावट पसरलेले आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.