नवी दिल्ली : केंद्र सरकारने नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड अर्थात NFL मधील 20 टक्के भागिदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही विक्री फॉर सेलनुसार केली जाणार आहे. निर्गुंतवणुकीच्या मुद्द्यावर सरकारने मर्चंट बँकरमधून शेअर सेलिंगला मॅनेज करण्यासाठी बोली मागवली आहे. मर्चंट बँकर 2 मार्चपर्यंत यासाठी बोली लावू शकतात. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक अॅसेट मॅनेटमेंट म्हणजे DIPAM ने बोली प्रक्रियेला घेऊन नोटिफिकेशन जारी केलं आहे.(Central government decides to sell 20 per cent stake in NFL)
महत्वाची बाब म्हणजे या निर्गुंवणुकीतून सरकार 400 कोटी रुपयांचा फंड जमा करु शकणार आहे. आज या कंपनीच्या शेअरचा भाव 41.65 रुपये आहे तर मार्केट कॅप 2000 रुपये आहे. अशावेळी जर सरकार 20 टक्के भागिदारी विकेल तर त्यातून 400 कोटी रुपये सरकारला मिळणार आहेत. सध्या या NFL मध्ये सरकारची 74.71 टक्के भागिदारी आहे.
या कंपनीची स्थापना 1974 मध्ये झाली होती. सध्या कंपनीमध्ये 3 हजार 339 कर्मचारी आहेत. सध्यस्थितीत कंपनीचे 5 आमोनिया प्लँट आहेत. या कंपनीची गनती सध्या मिनि रत्न कंपन्यांमध्ये होते. NFLची 25.29 टक्के भागिदारी ही फायनान्सियल इंस्टिट्यूशन्सकडे आहे.
सरकारने चालू आर्थिक वर्षात खासगीकरण आणि निर्गुंतवणूकीचं लक्ष्य 2.1 लाख कोटी रुपये ठेवलं आहे. आर्थिक वर्ष 2021- 2022 साठी हे लक्ष्य 1.75 लाख कोटी रुपये ठेवण्यात आलं आहे. येणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये सरकार मोठा गतीनं निर्गुंतवणुकीचा मार्ग अवलंबणार आहे. VSNL मधील 26.12 टक्के भागिदारी सरकार विकत आहे. या कंपनीचं नाव सध्या टाटा कम्युनिकेशन आहे. सरकार या द्वारे 8 हजार कोटी रुपयांचा फंड गोळा करेल असा अंदाज आहे.
सर्वात मोठी विमा कंपनी -भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा (IPO) निर्गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करणाऱ्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असे निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी! मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार
Central government decides to sell 20 per cent stake in NFL