पॅनकार्डच्या 'या' नियमात बदल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : टॅक्स चोरी प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी सरकारतर्फे पाच डिसेंबरपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये आता 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त व्यापार करणाऱ्या संस्थाना पॅन कार्ड बनवणे अनिवार्य आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार जी संस्था 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करत असेल, त्यांना पुढच्यावर्षी 31 मेच्या आधी पॅन कार्डसाठी अर्ज […]

पॅनकार्डच्या 'या' नियमात बदल
Follow us on

मुंबई : टॅक्स चोरी प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी सरकारतर्फे पाच डिसेंबरपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये आता 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त व्यापार करणाऱ्या संस्थाना पॅन कार्ड बनवणे अनिवार्य आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार जी संस्था 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करत असेल, त्यांना पुढच्यावर्षी 31 मेच्या आधी पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे.

जर त्यांनी पॅन कार्ड काढले नाही, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. टॅक्स विभागाने पॅन कार्डच्या नियमामध्ये अजून एक मोठा बदल केला आहे. ज्या मुलांचे वडील हयात नसतील किंवा वेगळे राहत असतील अशा मुलांना पॅन कार्डवर वडिलांच्या नावाचा समावेश करणे बंधनकारक नसेल.

पॅन कार्डच्या नव्या नियमामुसार जर कुणी एका वर्षात 2.5 लाखांचा व्यवहार करत असेल, तर त्यांना 31 मे पर्यंत पॅन कार्ड बनवणे बंधनकारक असेल. इनकम टॅक्स विभागात नोकरी करत असणारे मॅनेजिंग डायरेक्टर, डायरेक्टर, पार्टनर, ट्रस्टी यांसारख्या अधिकाऱ्यांकडे पॅनकार्ड नसेल, तर त्यांनाही 31 मेच्या आधी पॅन कार्ड काढणे बंधनकारक आहे.

पॅन कार्डच्या या नवीन नियमामुळे टॅक्स चोरीवर आळा बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या देशात टॅक्स चोरी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सरकारला याचा फटका बसतो. याच कारणामुळे आयकर विभागाकडून  पॅन कार्डच्या नियमात बदल करण्यात आले आहे.