नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचा (Crude Oil Price) अहिस्ता कदम, कदमताल सुरु आहे. कधी किंमतीत वाढ तर कधी घसरण, अशा दोलनामय स्थिती किंमती आहेत. पंधरा दिवसांपूर्वी कच्चा तेलाने किंमतीत मोठी उसळी घेतली. त्यानंतर किंमतींना टेकू मिळत नसल्याने या इंधनाने उसळी मारली नाही. त्यामुळे सर्वच देशांनी उसासा टाकला आहे. भारतीय तेल कंपन्यांना मार्चच्या तिमाहीत फायदा झाला. मे महिन्यात आता ओपेक संघटनेच्या धोरणाचा काय परिणाम होतो, ते दिसून येईल. सध्या रशिया आणि इराककडून भारताला स्वस्तात इंधन पुरवठा होत आहे. तेल उत्पादन घटविण्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) काय आहे, ते जाणून घेऊयात
या ठिकाणी महागडे इंधन
आज सकाळीच पेट्रोलियम कंपन्यांनी भाव जाहीर केले आहे. त्यानुसार, राज्यात जालना पेट्रोल 108.05 रुपये तर डिझेल 94.53 रुपये लिटर आहे. परभणी पेट्रोल 108.76 रुपये तर डिझेल 95.20 रुपये लिटर आहे. नांदेड पेट्रोल 108.32 रुपये तर डिझेल 94.78 रुपये लिटर आहे. यवतमाळ पेट्रोल 108.17 रुपये तर डिझेल 94.65 रुपये लिटर आहे आणि रत्नागिरीत पेट्रोल 108.01 आणि डिझेल 94.49 आज सर्वात महागडे आहे. तर रायगडमध्ये पेट्रोल 105.77 आणि डिझेल 92.28 हा भाव आहे.
कच्चा तेल वधारले
आज 25 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत फार मोठा उलटफेर झाला नाही. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 77.39 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 81 डॉलर प्रति बॅरलवर होते.
असा बसेल फटका
भाव एका SMS वर