केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी NPS वात्सल्य योजनेची सुरुवात केली. या योजनेची केंद्रीय बजेट 2024 मध्ये घोषणा करण्यात आली होती. अर्थमंत्र्यांनी NPS वात्सल्य योजनेत गुंतवणुकीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे उद्धघाटन पण केले. या योजनेची माहिती पत्रक पण जाहीर केले. त्यांनी लहान मुलांचे कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक (PRAN) कार्ड वितरीत केले. काय आहे ही योजना? कशी करता तुम्हाला या योजनेत गुंतवणूक?
काय NPS वात्सल्य योजना?
NPS वात्सल्य ही राष्ट्रीय पेन्शन योजनेची एक विस्तार योजना आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) या योजनेचे व्यवस्थापन करणार आहे. ही योजना लहान मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील गुंतवणूक दीर्घकालीन रक्कमेच्या तरतुदीसाठी करण्यात येते. लहान मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
मुलांच्या वृद्धापकाळाची आई-वडिलांना चिंता
या योजनेत आई-वडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी बचत सुरु करू शकतात. सध्या ही योजना NPS सारखीच काम करेल. या योजनेत योगदान देऊन एक सेवानिवृत्ती रक्कम तयार होईल. पारंपरिक निश्चित-उत्पन्न पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना आहे. योजनेत NPS योगदान इक्विटी आणि बाँड सारख्या बाजाराशी संबंधित फर्ममध्ये गुंतवणूक करण्यात येते. त्यातून चांगला परतावा मिळू शकतो.
NPS वात्सल्यची सुरुवात केंद्र सरकारने दीर्घकालीन वित्तीय सुरक्षा देण्यासाठी केली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना 1 जानेवारी, 2004 रोजी OPS च्या जागी आणण्यात आली होती. ही योजना UPS सारखी आहे. योजनेत अखेरच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के पेन्शन मर्यादीत करण्यासाठी वापरतात.
How to apply for NPS Vatsalya : कसा करणार अर्ज
आई-वडील बँक, टपाल खाते, पेन्शन फंड वा ई-एनपीएस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत सहभागी होऊ शकतो. ICICI Bank ने मुंबईतील सेवा केंद्रावर या योजनेची सुरुवात केली आहे. नवीन खात्यांची नोंद केली आणि तरुण ग्राहकांसाठी प्रतिकात्मक PRAN कार्ड दिले.
NPS वात्सल्य योजनेचे नियम (Rules for NPS Vatsalya Scheme) आहेत. या योजनेत भरती होण्यासाठी व्यक्ती भारतीय असणे आवश्यक आहे. या योजनेत समावेश असलेल्या मुलांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असायला हवे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वच जणांची KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेत 18 व्या वर्षांपर्यंत तीनदा रक्कम काढता येईल. तर सुरुवातीच्या तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. त्या काळात रक्कम काढता येणार नाही. एकदा लाभार्थी 18 वर्षांचा झाला तर त्याच्या नावे पुढील प्रक्रिया करण्यात येईल.