CNG Price : सीएनजीच्या भाव वाढीचा असाही फटका, सीएनजी वाहनांच्या संख्येत कमालीची घट, ग्राहकांनी कोणत्या वाहनांकडे वळविला मोर्चा?

| Updated on: Dec 09, 2022 | 11:01 PM

CNG Price : CNG च्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने या वाहनांचा टक्का घसरला आहे.

CNG Price : सीएनजीच्या भाव वाढीचा असाही फटका, सीएनजी वाहनांच्या संख्येत कमालीची घट, ग्राहकांनी कोणत्या वाहनांकडे वळविला मोर्चा?
सीएनजी दरवाढीचा फटका
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सीएनजीच्या किंमतीत (CNG Price Hike) सातत्याने वाढ होत आहे. एका अहवालानुसार, नैसर्गिक गॅसचे (Natural Gas) भाव भरघोस वाढल्याने या वाहनांच्या वापरावर मर्यादा येत असून नवीन वाहनांच्या विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. वाहनांचा टक्का घसरला आहे. आतापर्यंत पेट्रोल-डिझेलपेक्षा (Petrol-Diesel) सीएनजी स्वस्त असल्याने या वाहनांकडे वाहनधारकांचा ओढा वाढला होता. पण रशिया-युक्रेन युद्धानंतर नैसर्गिक गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांचा भ्रमनिरास झाला आहे.

रेटिंग संस्था इंक्राच्या रिपोर्टनुसार नैसर्गिक गॅसच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये व्यावसायिक वाहनांमधील सीएनजीचा वापर 9 ते 10 टक्क्यांनी घसरला आहे. वाहनधारकांचा हिरमोड होत असल्याने त्यांनी सीएनजीला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत कमाल वाढ नोंदविण्यात आली आहे. एकाच वर्षात सीएनजीच्या भावात 70 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलच्या आणि सीएनजीच्या किंमतीत फारसे अंतर उरले नाही. त्यामुळे वाहनधारक आता सीएनजीचा वापर कमी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

इक्रा रेटिंग्सनुसार, पूर्वी डिझेल आणि सीएनजी यांच्यातील बाजार भावात मोठा फरक होता. त्यामुळे सीएनजी वाहनांचा वापर वाढला होता. पण आता या दोघांमधील किंमतीतील फरक जास्त नसल्याने सीएनजी वाहनांचा वापर कमी झाला आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनी सीएनजीचा वापर कमी केला आहे.

सीएनजीचा वापर करणाऱ्याा एकूण वाहनांचा हिस्सा कमी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये हा वाटा 38 टक्क्यांनी तर या आर्थिक वर्षात 2022-23 मधील सुरुवातीच्या आठ महिन्यात 27 टक्क्यांनी घसरण नोंदविण्यात आली. प्रवासी सेगमेंटमध्ये अजूनही सीएनजीचा वापर सुरु आहे.

वाहनधारकांनी आता सीएनजीवरुन डिझेल वाहनांकडे तर प्रवासी सेगमेंटमधील वाहनधारकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे मोर्चा वळविला आहे. लोक स्वस्त पर्यायाकडे वळू लागेल आहेत. त्याचा फटका सीएनजी वाहनांना बसत आहे.

1 ऑक्टोबर 2021 रोजी सीएनजी दिल्लीत 45.5 रुपये प्रति किलो होता. तर आज एक किलो सीएनजीसाठी 78.61 रुपये मोजावे लागत आहे. म्हणजे 14 महिन्यात सीएनजीच्या किंमतीत किलोमागे 33.11 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहे.