नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा. हे नवीन आर्थिक वर्ष जनतेसाठी गुडन्यूज घेऊन आले. रेपो दरात कुठलीही वाढ झाली नाही. रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असताना अचानक आरबीआयने यू-टर्न घेतला. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) 25 बेसिस पॉईंटची वाढ करेल, असा अंदाज होता. यापूर्वी केंद्रीय बँकेने सहा वेळा रेपो दरात वाढ केली होती. त्यामुळे यावेळी सातव्यांदा पुन्हा दरवाढ अटळ वाटत असतानाच हा दिलासा मिळाला. यामुळे वाढत्या ईएमआयपासून जनतेला दिलासा मिळेल.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वात 3, 5 आणि 6 मार्च रोजी आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरु होती. ही बैठक संपल्यानंतर रेपो दरात कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे कर्जावरील ईएमआयमध्ये वाढ होणार नाही. कोरोना काळात स्वस्तात कर्ज घेतलेल्या कर्जदारांना नंतर मोठा ईएमआय भरावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे बजेट संपूर्णपणे कोलमडले आहे.
महागाई निर्दशांक काय
या नवीन वर्षात आरबीआयच्या पतधोरण समितीची ही पहिली बैठक होती. तर या नवीन वर्षातील दुसरी बैठक होती. देशातील किरकोळ महागाई जानेवारीमध्ये 6.52 टक्के आणि फेब्रुवारी महिन्यात 6.44 टक्के होती. हा आकडा महागाईच्या दिलासादायक प्रमाणापेक्षा वाढीव होता. आरबीआयच्या धोरणापेक्षा अधिक होता. त्यामुळेच रेपो दरात वाढीची शक्यता होती.
गेल्या वर्षांतील आकडेवारी
सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. हा महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता. 7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ झाली. तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढेल. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला होता.
250 बेसिस पॉईंटची वाढ
भारतीय केंद्रीय बँकेने आतापर्यंत रेपो रेट दरात सहा वेळा वाढ केली आहे. ज्या दरावर इतर बँकांना आरबीआय उधार कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हणतात. मे 2022 पासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये 250 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षातील ही पहिली तर या वर्षातील दुसरी वाढ ठरेल. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने यापूर्वी रेपो दर 25 बीपीएसने वाढवला होता.
अशी झाली वाढ
आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता. 7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे.