मुंबई : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) गेल्या 9 महिन्यांपासून लोक घरांमध्ये आहेत. बहुतांश लोकांचं कामकाज घरुनच सुरु आहे. अशातच देशात अनेक ठिकाणी कंडोमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार आता रात्रीऐवजी दिवसा कंडोमची जास्त विक्री होत आहे. या रिपोर्टमध्ये Dunzo अॅपच्या रिपोर्टचा दावा करण्यात आला आहे. या अॅपद्वारे रात्रीपेक्षा दिवसा तिप्पट कंडोमची विक्री होत आहे. (Condom and Ipill order spikes in corona pandemic)
कोरोनाकाळात रात्रीपेक्षा दिवसा कंडोमची विक्री अधिक होत आहे. हैदराबादमध्ये रात्रीपेक्षा दिवसा 6 पटीने अधिक कंडोम विकले जात आहेत. चेन्नईमध्ये 5 पट, मुंबई आणि बंगळुरुमध्ये 3 पटीने अधिक कंडोमची विक्री होत आहे. कोरोना काळात केवळ कंडोमचाच वापर वाढलेला नसून सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनही मोठ्या प्रमाणाता वाढले आहे. बंगळुरुमध्ये रोलिंग पेपरची मागणी चेन्नईपेक्षा 22 पटींनी अधिक आहे. रोलिंग पेपरचा वापर सिगारेट तयार करण्यासाठी तसेच तबांखूसह इतर अंमली पदार्धांचे सेवन करण्यासाठी केला जातो.
बंगळुरु आणि पुण्यात गर्भनिरोधक गोळ्यांची सर्वाधिक मागणी
बंगळुरु, पुणे, गुरुग्राम, हैदराबाद आणि दिल्लीत गर्भनिरोधक गोळ्यांच्या सर्वाधिक ऑर्डर्स आल्याचे सांगण्यात आले आहे. तर जयपूरमध्ये प्रेग्नंसी किटची मागणी सर्वाधिक आहे.
मुंबईत डाळ-खिचडी तर बंगळुरुत चिकन बिर्याणीसाठी सर्वाधिक ऑर्डर्स
खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीत बंगळुरुत चिकन बिर्याणीसाठी सर्वाधिक ऑर्डर्स आल्या आहेत. मुंबईत डाळ खिचडी आणि चेन्नईतून ईडलीसाठी सर्वाधिक ऑर्डर्स आल्या आहेत. गुरुग्रामध्ये आलू टिक्की बर्गरची सर्वाधिक विक्री झाली आहे.
पुण्यात दुधाची सर्वाधिक मागणी
पुणे आणि हैदराबादमध्ये दुधाची सर्वाधिक मागणी आहे, तर राजधानी दिल्लीत सॉफ्ट ड्रिंक्सची मागणी अधिक आहे.
मुंबईतही कंडोमचा वापर वाढला
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. मागील पाच वर्षांपासून लग्न झालेली जोडपी कुटुंब नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात कंडोमचा (Condom) वापर करत आहेत, अशी माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (NFHS) समोर आली आहे.
पुरुषांकडून मोठ्या प्रमाणात कंडोम वापरण्यात येत असल्यानं महिलांमध्ये नसबंदी आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर कमी झालाय. पुरुषांच्या कौटुंबिक नियोजनामुळे हा बदल होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 22 राज्यांतील शहरी आणि ग्रामीण भागातही हा बदल होत असल्याची माहिती भारतीय लोकसंख्या परिषदेच्या डॉ. राजीब आचार्य यांनी दिली.
हेही वाचा
‘जिंगल बेल, जिंगल बेल’ म्हणत चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे ‘सांताक्लॉज’ नेमके कोण?
‘फेअर अँड लव्हली खाती हूँ’ म्हणत यूट्यूबरने चक्क क्रीम खाल्ली, व्हिडीओ बघून पोट धरुन हसाल
कुटुंब कल्याणासाठी पुरुषही सरसावले, कंडोमचा वापर वाढला ! मुंबई पॅटर्न वाचा
(Condom and Ipill order spikes in corona pandemic)