भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना या महिन्यात सातत्याने झटके दिले. बाजारात कोसळधार सुरू आहेत. या पडझडीच्या सत्रातही पेटीएम शेअरने जलवा दाखवला आहे. पेटीएमचे शेअर गेल्या पाच महिन्यात 120 टक्क्यांहून अधिकने उसळले आहे. कंपनीच्या शेअरमध्ये भविष्यात पण मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. RBI ने कारवाई केल्यानंतर पेटीएममध्ये मोठी पडझड झाली होती. पण आता पेटीएमने राखेतून पुन्हा भरारी घेतली आहे. ब्रोकरेज हाऊस सिटीने (Citi) पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचे रेटिंग अपग्रेड केले आहे. सिटीने गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने यापूर्वी पेटीएम शेअर विक्रीचा सल्ला दिला होता.
900 रुपयांचे टार्गेट प्राईस
ब्रोकरेज हाऊस सिटीने पेटीएमच्या शेअरचे टार्गेट प्राईस 100 टक्क्यांहून अधिकने वाढवले आहे. सिटीने पेटीएमचे शेअर येत्या काही दिवसात 900 रुपयांवर पोहचतील असे भाकित केले आहे. ब्रोकरेज हाऊसने यापूर्वी या शेअरला 440 रुपयांचे टार्गेट दिले होते. सध्या 778.50 रुपयांवर आहे. तर या शेअरने 52 आठवड्यातील 952.60 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. तर या कंपनीची 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 310 रुपये अशी आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सचे मार्केट कॅप 48,477 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
5 महिन्यात 120 टक्क्यांहून अधिकने घेतली उसळी
पेटीएमच्या शेअर्सनी गेल्या 5 महिन्यात 120 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. कंपनीचे शेअर 24 मे 2024 रोजी 340.95 रुपयांवर होते. पेटीएम शेअर आज 24 ऑक्टोबर रोजी 778.50 रुपयांच्या जवळपास आहे. गेल्या 6 महिन्यात पेटीएमच्या शेअरमध्ये जवळपास 98 टक्के उसळी दिसली. तर पाच महिन्यात या शेअरने 120 टक्क्यांहून अधिकची भरारी घेतली. तर या वर्षात पेटीएमच्या शेअरमध्ये जवळपास 18 टक्क्यांहून तेजी दिसली. पेटीएमचा आयपीओ 8 नोव्हेंबर 2021 रोजी उघडला होता. 18 नोव्हेंबर 2021 रोजी हा शेअर बीएसईवर 1955 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.