Crorepati Formula : मागे राहता कशाला? मिळाला करोडपती होण्याचा फॉर्म्युला, 20:20:20 चे गणित माहिती आहे का? असा होईल फायदा

| Updated on: Dec 18, 2024 | 4:36 PM

20:20:20 Investment Formula : म्युच्युअल फंड एसआयपी हे मोठा निधी उभारण्याचे एक सशक्त माध्यम मानण्यात येते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा उत्तम पर्याय मानण्यात येतो. काही फंड हे कर बचत करणारे असतात. SIP च्या माध्यमातून एका छोट्या रक्कमेतून मोठी रक्कम उभारता येते.

Crorepati Formula : मागे राहता कशाला? मिळाला करोडपती होण्याचा फॉर्म्युला, 20:20:20 चे गणित माहिती आहे का? असा होईल फायदा
करोडपती फॉर्म्युला
Follow us on

करोडपती होणे कोणाला आवडणार नाही? पण अनेक जणांचे आर्थिक व्यवस्थापन, नियोजन आणि शिस्तचं पालन न केल्याने नुकसान होते. पहिलाच हेटाळणीचा स्वर त्यांचे पुढचे स्वप्न भंग करतो. अनेक जणांना झटपट पैसा कमावयाचा असतो. पण त्याची जोखीम स्वीकारायची त्यांची तयारी नसते. एका फॉर्म्युलाद्वारे तुम्ही मोठी रक्कम उभारू शकता. Mutual Fund SIP अंतर्गत असा फॉर्म्युला आहे. त्याआधारे तुम्ही जवळपास 6 कोट रुपयांहून अधिकची रक्कम उभारू शकता.

गुंतवणुकीत सातत्य करेल श्रीमंत

म्युच्युअल फंड एसआयपी हा श्रीमंतीचा सोपा मार्ग आहे. त्यातंर्गत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होतो. तुम्ही या रक्कमेवर काही कर बचत सुद्धा करू शकता. SIP च्या जोरावर तुम्ही छोटी ते मोठी रक्कम एका निश्चित कालावधीत गुंतवणूक करू शकता. या रक्कमेवर तुम्हाला कम्पाऊंडिंगाचा फायदा मिळतो. प्रत्येक दिवशी तुमचा पैसा वाढतो. काही वर्षांनी व्याजावर व्याज आणि मुळ रक्कमेत ही रक्कम जमा झाल्यावर त्यावर व्याज अशी चक्रवाढ सुरू असते. त्याचा अखेरीस मोठा फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

पण या गुंतवणूक सूत्रात सातत्य महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोट्यवधी रुपये हवे असतील तर एसआयपी सुरू करण्यापूर्वी गुंतवणूक तज्ज्ञाचे मार्गदर्शन आवश्य घ्या. योग्य फंडाची निवड करा. तुमच्या गुंतवणुकीचे कारण समजून नंतर पैसे गुंतवा. त्याआधी हा फॉर्म्युला समजून घ्या.

20:20:20 चा फॉर्म्युला काय?

जर तुम्ही 20:20:20 चा फॉर्म्युल्यावर अंमलबजावणी केली तर काही वर्षातच तुमच्याकडे 6 कोटींहून अधिकची रक्कम असेल. त्यासाठी अर्थातच मोठी रक्कम गुंतवावी लागेल. प्रत्येक महिन्याला 20 रुपयांची SIP करावी लागेल. या रक्कमेवर साधारणतः सरासरी 20 टक्के रिटर्न मिळेल असे गृहित धरा. तर 20 वर्षे सलग तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागेल.

मग कसे मिळतील 6 कोटी?

तुम्ही दरमहा 20 हजारांची SIP केली आणि त्यावर 20 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर 20 वर्षे सलग गुंतवणूक केल्यास ही रक्कम 6 कोटी 32 लाख 29 हजार 587 रुपये होईल. तुम्हाला या रक्कमेवर 5 कोटी 84 लाख 29 हजार 587 रुपयांचा परतावा मिळेल. तर गुंतवणूक केलेली रक्कम ही 48 लाख इतकी असेल.