Marathi News Business Crude oil crash, prices hit low, prices so low, petrol diesel prices reduced in your city or not know the petrol diesel rate today
Petrol Diesel Rate Today : धडामधूम, कच्चा तेलाचे लोटांगण, स्वस्त झाले का पेट्रोल-डिझेल
Petrol Diesel Rate Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती दणकावून आपटल्या. किंमती आता थेट 75 डॉलर प्रति बॅरलवर आल्या आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती झाल्या का कमी, काय आहे आजचे भाव
Ad
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती(Crude Oil Price) दणकावून आपटल्या आहेत. कच्चा तेलाचे भाव घसरल्याने तेल कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. गेल्या 15 महिन्यांपासून कच्चा तेलाच्या किंमती नियंत्रणातच नाही तर घसरणीवर आहेत. त्याचा भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता भाव अपडेट केले. तुमच्या शहरातील शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) झाल्या का कमी, काय आहे आजचे भाव, इंधनाचे दर तुम्हाला एका एसएमएसवर सुद्धा जाणून घेता येईल.
कच्चे तेल इतके आपटले
16 जून रोजी कच्चा तेलात मोठी घसरण पहायला मिळाली. ब्रेंट क्रूड ऑईल 75.48 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 70.47 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
दरात कपात
केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.