नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) एका वर्षात कधीच 139 डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहचले नाही. या भावाने मध्यंतरी 90 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा गाठला असला तरी अल्पावधीतच कच्चा तेलात घसरण झाली. कंपन्यांचा उरलासुरला सर्व तोटा, नुकसान भरुन निघाले आहे. या कंपन्यांनी मार्च महिन्याच्या तिमाहीत जोरदार कमाई केली आहे. भारतीय तेल उत्पादक आणि विपणन कंपन्या रशियाकडून स्वस्तात इंधन घेऊन त्याची युरोपातील राष्ट्रांमध्ये विक्री करत आहेत. त्याचा फायदा त्यांना मिळाला आहे. कच्चे तेल गेल्या अनेक महिन्यांपासून स्वस्त असले तरी त्याचा कवडीभरही फायदा देशातील नागरिकांना मिळाला नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Rate Today) कमी झाल्या नाहीत. कच्चा तेलाचे भाव वधारले की ताबडतोब दरवाढ करणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवणार तरी कोण?
अशी झाली घसरण
जागतिक बाजारात कच्चा तेलाने जबरदस्त उसळी घेतली होती. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. जानेवारी 2023 मध्ये किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. नंतर त्यात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय जून 2017 पूर्वी इंधनाच्या किंमती दर 15 दिवसांनी अपडेट करण्यात येत होत्या. पण हा नियम बदलण्यात आला. आता रोज भावात बदल होतो.
13 महिन्यात दिलासा नाही
कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होऊन गेल्या 13 महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 22 मे 2022 रोजी पेट्रोलच्या किंमतीत कपात झाली होती. तेव्हापासून किंमतीत मोठा बदल झाला नाही. देशातील अनेक भागात पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरवर पोहचले. तेल कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.
कच्चा तेलात घसरण
आज कच्चा तेलात घसरण झाली. 9 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 75.72 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 70.97 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत.
भाव एका SMS वर
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)