Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर घसरले आहेत. या भावांआधारे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होतो. आज वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी इंधनाचे दर जाणून घ्या.
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात(Crude Oil Price) पुन्हा एकदा घसरण झाली. गेल्या दोन महिन्यांपासून इंधनाच्या दर जमिनीवर आहेत. त्यात मामुली तफावत दिसून येते. भाव किंचित वधरतात आणि पुन्हा घसरतात. भावातील हा बदल भारतीय तेल विपणन कंपन्यांच्या पथ्यावर पडत आहे. आजही कच्चे तेल घसरले. त्याआधारे तेल विपणन कंपन्या देशात पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) निश्चित करतात. तेलाच्या किंमती 75 ते 87 डॉलर प्रति बॅरलच्या आतच खेळत आहे. अनेक दिवसांपासून भावात कपात करण्याची मागणी जोर धरत आहे. पण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि तेल कंपन्यांनी (OMCs) अधिकृतपणे याविषयीची भूमिका जाहीर केलेली नाही. आज वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी इंधनाचे दर जाणून घ्या.
14 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) घसरुन 74.77 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 80.78 डॉलर प्रति बॅरल आहे. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झाला होता. त्यावेळी उत्पादन शुल्क कपात करण्यात आले होते. त्यानंतर मात्र मोठा बदल झालेला नाही. आज, तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले.