Marathi News Business Crude oil has become expensive, the price has jumped sharply, what is the price of petrol diesel in your city today
Petrol Diesel Price Today : सर्वात स्वस्त पेट्रोल ठाण्यात! या ठिकाणी सर्वाधिक महाग, तुमच्या शहरात काय आहे भाव
Petrol Diesel Price Today : राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल ठाण्यामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : कच्चा तेलाने आंतरराष्ट्रीय बाजारात उसळी घेतली. तेल उत्पादन घटविल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. गेल्या आठवड्यात घेतलेल्या या निर्णयाने अनेक देशांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. ओपेक आणि रशियाने तेल उत्पादन घटवले. त्यामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अपेक्षित आहे. पंधरवाड्यातच तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी 13 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 83.18 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 87.21 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर (Petrol Diesel Price) वाढले आहेत.
ठाण्यात सर्वात स्वस्त
राज्यात सकाळीच पेट्रोलियम कंपन्यांनी भाव जाहीर केले. त्यानुसार, ठाण्यात पेट्रोल 105.74 रुपये लिटर आहे. तर डिझेलचा भाव, 92.24 रुपये लिटर आहे. तर परभणी, नांदेडमध्ये पेट्रोल सर्वाधिक महागडे आहे. या शहरात अनुक्रमे 108.76, 108.71 रुपये प्रति लिटर भाव आहे. नांदेडमध्ये डिझेलचा भाव 95.15 रुपये लिटर आहे. तर परभणीमध्ये डिझेल 95.20 रुपये लिटर विक्री होत आहे.
कोणत्या देशाकडून होतो पुरवठा
हे सुद्धा वाचा
सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.
भाव एका SMS वर
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
करासंबंधी असा झाला बदल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे