Petrol Diesel Price Today : परभणी, नांदेडमध्ये नेहमी प्रमाणेच पेट्रोल-डिझेल महागडे आहेत. राज्यातील इतर शहरांतील इंधनाचा भाव जाणून घ्या..
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल(Crude Oil Price) घसरणीनंतर पुन्हा वधारले आहे. भावात मोठी वाढ झाली नसली तरी महागाईकडे आगेकूच सुरु आहे. मे महिना आता तोंडावर येऊन ठेपला आहे. कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण ओपेक प्लस संघटनांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता मेपासून होत आहे. त्यामुळे भारतीय तेल विपणन कंपन्यांनी त्यासाठी काय तयारी केली आहे. हे समोर येईल. रशियाकडून भारताला सध्या कच्चा तेलाची सर्वाधिक विक्री होत आहे. त्यापाठोपाठ इराण पण मदतीला धावला आहे. मार्चच्या तिमाहीत तेल कंपन्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे मे, जून महिन्यात पेट्रोल-डिझेलचा (Petrol Diesel Price) भडका उडतो की भाव स्थिर असतील हे समोर येईल.
कच्चे तेल वधारले
आज 25 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत फार मोठा उलटफेर झाला नाही. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 78.36 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 82.35 डॉलर प्रति बॅरलवर होते.