नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चे तेल तेजीत आहे. पण क्रूड ऑईलच्या (Crude Oil) किंमती भडकलेल्या नाहीत. ओपेक प्लस संघटनांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी जाहीर केला होता. तसेच त्याची अंमलबजावणी मे महिन्यापासून करण्याची घोषणा केली होती. आता जवळपास अर्धा मे उलटणार आहे. पण या निर्णयाचे परिणाम जागतिक बाजारात दिसून आले नाहीत. भारताला सध्या रशिया आणि इराणकडून स्वस्तात इंधन मिळत आहे. पण या निर्णयाचा आयातीवर परिणाम दिसू शकतो. परभणीसह राज्यातील या शहरात पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) महाग झाले आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर जाणून घेता येईल.
कच्चा तेलाची किंमत
आज 11 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 72.96 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 76.79 डॉलर प्रति बॅरल झाले.
मोठा बदल नाही
केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा तर झालाच. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही.
प्रति लिटर इतका फायदा
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)