नवी दिल्ली : ओपेक+ देशांसह रशियाने (OPEC Russia) कच्चा तेलाचे उत्पादन घटविल्याने पेट्रोलियम कंपन्यांसमोर अंधारी आली आहे. भावाने मुसंडी मारल्याने या कंपन्याची झोप उडाली आहे. गेल्या वर्षभरापासून या कंपन्यांना रशियाकडून स्वस्तात इंधनाचा पुरवठा होत आहे. तर केंद्र सरकारने पण या कंपन्यांना नुकसान भरपाई भरुन काढण्यासाठी कोट्यवधींचे पॅकेज दिले होते. आता रशिया पण कच्चा तेलाच्या किंमती वाढवू शकतो. त्याचा परिणाम देशातील जनतेवर पडू शकतो. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) भडकण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम ही काही शहरातील भावावरुन दिसून येत आहे.
आज काय आहेत भाव
आज शुक्रवारी, 7 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 80.70 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 85.12 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पण बदल झाला आहे. देशातील तेल विपणन कंपन्या दर दिवशी सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर करतात. देशात गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्र सरकारने कर कपात केली. तेव्हापासून इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. राज्यात परभणी, बीड, नांदेड या ठिकाणी पेट्रोलच्या किंमती महाग आहेत. अनुक्रमे 109.01, 108.04 108.08 रुपये प्रति लिटर भाव आहे.
रशियाच्या निर्णयावर दरवाढ
एप्रिल ते डिसेंबर 2022 या दरम्यान भारताने एकूण 1.27 अब्ज बॅरल तेल खरेदी केले. यामधील जवळपास 19% कच्चे तेल रशियाकडून आलेले होते. या नऊ महिन्यात भारताने सौदी अरब आणि इराक पेक्षा रशियाकडून जास्त कच्चा तेलाची खरेदी केली. त्यामुळे भारताला प्रति बॅरल 2 डॉलरचा फायदा झाला आहे. आता रशिया काय निर्णय घेतो, त्यावर पुढील दरवाढ अटळ असेल.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
उत्पादन घटवले