Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात अमेरिकेने व्याजदर वाढविल्याने डॉलरचा मोठा दबाव तयार झाला आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात डॉलरचा दबाव वाढत आहे. अमेरिकेन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे उलथापालथ सुरु आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यामुळे सोने-चांदी, इंधनावर परिणाम दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता इंधनाचे भाव जाहीर केले. शुक्रवारी कच्चा तेलाचे दर किंचित वाढले. काल भाव गडगडले होते. आज 5 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 68.70 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 72.61 डॉलरहून प्रति बॅरलवर आले आहे. आज सर्वच शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) मोठा बदल दिसला नाही. तुमच्या शहरातील इंधनाचा दर किती आहे, जाणून घेऊयात.
इंधन होईल स्वस्त
सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.
जून महिन्यात पहिली कपात
मे महिन्यात कर्नाटक राज्यातील निवडणूक आहे. त्यानंतर 4 राज्यातील निवडणूका होतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. याच कालावधीत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.