नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती (Crude Oil Price) सध्या स्थिर आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली होती. तेलाचा भाव 90 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहचला होता. ओपेक प्लस या तेल उत्पादक संघटनेने तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान इराकने भारताला 2 डॉलर प्रति बॅरल स्वस्तात इंधन पुरवठा सुरु केला आहे. त्याचा भारताला फायदा होईल. आज सकाळीच पेट्रोलियम कंपन्यांनी भाव जाहीर केले आहे. त्यानुसार, राज्यात पुण्यात सर्वात स्वस्त इंधन आहे. पुण्यात पेट्रोल (Petrol Price) 105.78 रुपये तर डिझेल (Diesel Price) 92.30 रुपये लिटर आहे.
कच्चा तेल वधारले
आज 23 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत फार मोठा उलटफेर झाला नाही. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 77.87डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 81.66 डॉलर प्रति बॅरलवर होते.
इराककडून आवक
रशिया पाठोपाठ आता इराण भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)