नवी दिल्ली : कच्चा तेलाने (Crude Oil) महागाईला आमंत्रण दिले आहे. या आठवड्यात कच्चा तेलाने एकदम मुसंडी मारली. ओपेक+ देशांसह रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटविल्याने मोठा फटका बसला. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) भडकण्याची भीती आहे. जगातील तेल उत्पादक देशांची संघटना OPEC ने कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात केली. तर रशियाने यापूर्वीच तेल कपातीचे शस्त्र उगारले होते. आता चीनमध्ये इंधनाचा खप वाढल्याने कच्चा तेलाची मागणी वाढली आहे. आता येत्या काही दिवसात भारताला रशियाकडून स्वस्तात मिळणाऱ्या इंधनाच्या किंमती पण वधारण्याची भीती आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसून येईल. यामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
आज दरवाढीला ब्रेक
देशात गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्र सरकारने कर कपात केली. तेव्हापासून इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. इंधनाच्या दरवाढीला आज 6 एप्रिल रोजी ब्रेक लागला. आज किंमतीत वाढ न होता घसरण झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलची (WTI Crude Oil) किंमत 80.44 डॉलर प्रति बॅरलवर आल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 85.84 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरल्या.
पेट्रोल-डिझेलची महागाई
सौदी अरबसह 23 देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी याविषयीची घोषणा करण्यात आली. हे सर्व देश मिळून 19 कोटी लिटर कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात करतील. त्यामुळे इंधनाची किंमती प्रति बॅरल 10 डॉलरपर्यंत वाढतील. त्याचा भारतासह जगावर थेट परिणाम होईल. म्हणजे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल-डिझेल महाग होईल.
भारतावर काय होईल परिणाम
एप्रिल ते डिसेंबर 2022 या दरम्यान भारताने एकूण 1.27 अब्ज बॅरल तेल खरेदी केले. यामधील जवळपास 19% कच्चे तेल रशियाकडून आलेले होते. या नऊ महिन्यात भारताने सौदी अरब आणि इराक पेक्षा रशियाकडून जास्त कच्चा तेलाची खरेदी केली. त्यामुळे भारताला प्रति बॅरल 2 डॉलरचा फायदा झाला आहे.
कोणत्या देशाकडून होतो पुरवठा
भाव एका SMS वर