नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात रशियाने कच्चा तेलाचे (Crude Oil) उत्पादन घटवले असले तरी किंमती अद्यापही भडकल्या नाहीत. अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रे दबाव टाकत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. अमेरिकेला कच्चा तेलातून नफा हवा आहे. त्यामुळे मार्केट कॅप (Market Cap) वाढविण्यासाठी आणि रशिया भारतासारख्या देशांना स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत असल्याने पाश्चिमात्य देश मार्केट कॅपसाठी दडपण आणत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. अमेरिका आणि अरब राष्ट्रातून कच्चा तेलाचा पुरवठा सुरु आहे. कच्चा तेलाचे भाव आज पुन्हा घसरले. देशात गेल्या 308 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) लक्षणीय बदल झालेला नाही. 22 मे रोजी उत्पादन शुल्क कपातीनंतर देशात इंधनाचे दर कमी झाले होते.
देशात कच्चा तेलाच्या आधारावर सरकारी तेल विपणन कंपन्या सकाळी भाव जाहीर करतात. आज डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 1 टक्का घसरण झाली. आज हा भाव 69.26 डॉलर प्रति बॅरलवर उतरला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 1.21 टक्क्यांनी घसरले. आजचा भाव 74.99 डॉलर प्रति बॅरल आहे.
या घसरणीचे कारण काय
शुक्रवारी आठवड्यातील भावात जोरदार उसळी आली होती. पण डब्ल्यूटीआय आणि ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये जवळपास 4 टक्क्यांची घसरण झाली. डॉलर महागल्याने खरेदीदारांसाठी कच्चा तेलाची खरेदी महागली. पण अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर वाढीचा परिणाम जगभर दिसून आला. तो युरोपात ही दिसून आला. वायदे बाजारात युरोपियन बँकिंग सेक्टरला फटका बसला. कच्चा तेलाच्या किंमतीत घसरणीला या घडामोडी कारणीभूत ठरल्या.
कोणत्या देशाकडून होतो पुरवठा
भाव एका SMS वर