नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाने लोळण घेतले आहे. भावात जोरदार घसरण झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्या फायद्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाने जोरदार उसळी घेतली होती. क्रूड ऑईल (Crude Oil) थेट 90 डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहचले होते. ओपेक प्लस देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याची घोषणा केली असली तरी त्याचा फारसा परिणाम बाजारावर दिसून आलेला नाही. देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) जाहीर केला. आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. देशात आता इतर राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचा बिगूल वाजेल. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती 20 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
कशाचा झाला परिणाम
अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. डॉलरचा दबाव दिसून येत आहे. तर त्याचवेळी अमेरिकेसह युरोपात जागतिक मंदीचे वारे वाहत आहे. मंदीचा फेरा कधी येईल हे निश्चित नसले तरी त्याची भीती मात्र कायम आहे. जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सच्या बातमीनुसार, कच्चा तेलाने मंदीच्या भीतीने 2 टक्क्यांची उसळी घेतली होती.
कच्चा तेलात घसरण
आज 10 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 0.27 टक्क्यांनी घसरुन हा भाव 73.51 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 0.26 टक्क्यांनी कमी झाले. भाव 77.24 डॉलर प्रति बॅरल झाले.
एक लिटरवर कराचे गणित
एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 1 मे रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतील.
कोणत्या देशाकडून होतो पुरवठा
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)