Petrol Diesel Price Today : कच्चे तेलाचे भाव अजूनही तेजीत आहे. तेल कंपन्यांच्या कपाळावर त्यामुळे आठ्या आल्या आहेत. आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : रविवारी, घराबाहेर पडण्यापूर्वी एकदा पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price) नक्की चेक करा. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. कच्चा तेलाचे दर पुढील महिन्यात गगनाला भिडण्याची शक्यता आहे. 23 देशांच्या ओपेक प्लस संघटनेने तेल उत्पादन घटविण्याचा घेतलेला निर्णय त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लवकरच महागाईचा सामना करावा लागू शकतो. परंतु, अशा विपरित स्थितीत रशियानंतर इराकही भारताच्या मदतीला धाऊन आला आहे. भारताने रशियाकडून क्रूड ऑईलची (Crude Oil) आयात वाढवल्यानंतर इराकने स्वस्तात इंधनाचा पुरवठा सुरु केला आहे. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय आहे.
कच्चा तेलाची दरवाढ
16 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 0.44 टक्क्यांची वाढ झाली. हा भाव 82.52 डॉलरवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 86.31 डॉलर प्रति बॅरलवर आहे. दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत.