नवी दिल्ली | 10 March 2024 : तर क्रिप्टो बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. बिटकॉईनने तर चारचांद लावले आहे. गुंतवणूकदारांची सध्या बल्ले बल्ले सुरु आहे. पण क्रिप्टो करन्सीत सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्तान नागरिक भारतीय गुंतवणूकदारांपेक्षा क्रिप्टोत अधिक गुंतवणूक करतात हे तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे या यादीत विकसीत आणि मोठे देश अत्यंत पिछाडीवर आहेत. तर काही छोट्या छोट्या देशांनी टॉप-10 मध्ये स्थान पटकावले आहे.
काय सांगते रॅकिंग
तर लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन क्रिप्टो ऑनर्स (Crypto owners) आधारे ही यादी तयार केली आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स ने ही यादी तयार केली आहे. टॉप-10 मध्ये सर्वात टॉपवर संयुक्त अरब अमिरात आहे. UAE च्या एकूण लोकसंख्येपैकी 30.39 टक्के लोक क्रिप्टो ऑनर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर व्हिएतनाम हा देश आहे. 21.19 टक्के व्हिएतनामी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करतात. तर अमेरिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील 15.56 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात.
चौथ्य स्थानावर इराण
या यादीत चौथ्या क्रमांकावर इराण हा देश आहे. यातील 13.46 टक्के लोक क्रिप्टो ऑनर्स आहेत. पाचव्या क्रमांकावर फिलिपिन्सचा क्रमांक आहे. या देशातील 13.43 टक्के लोक क्रिप्टो चलनात गुंतवणूक करतात. ब्राझिलमधील 11.99 टक्के लोक क्रिप्टो ऑनर्स आहेत. त्यानंतर सौदी अरबमधील 11.37 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात. सिंगापूर 11.05 क्रिप्टो ऑनर्ससह आठव्या क्रमांकावर आहेत. नवव्या क्रमांकावर युक्रेन हा देश आहे. येथील एकूण लोकसंख्येच्या 10.57 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात. या यादीत 10 व्या क्रमांकावर व्हेनेझुएला हा देश आहे. येथील 10.30 टक्के लोक क्रिप्टोत गुंतवणूक करतात.
पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे