क्रिप्टोकरन्सीने लावले चार चाँद, एलॉन मस्क झाला मालामाल, आठवडाभरातच 145 टक्क्यांची उसळी

| Updated on: Nov 13, 2024 | 12:19 PM

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सनी बाजार सध्या तेजीत आला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यानंतर आठवडाभरातच क्रिप्टोकरन्सीत बहार आली आहे. जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोत 145% उसळी आली आहे. हा बाजार अजून फुलणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

क्रिप्टोकरन्सीने लावले चार चाँद, एलॉन मस्क झाला मालामाल, आठवडाभरातच 145 टक्क्यांची उसळी
क्रिप्टोचा बाजार तेजीत
Follow us on

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टो करन्सी नवीन विक्रमावर पोहचली आहे. त्यातच जागतिक अब्जाधीश आणि ट्रम्प यांचे मित्र एलॉन मस्क यांना तर मोठा फायदा झाला आहे. त्यांची आवडती क्रिप्टो करन्सी सध्या तेजीत आहे. मस्क यांची फेव्हरेट क्रिप्टो करन्सी डॉगकॉईनमध्ये 145 टक्क्यांची उसळी आली आहे. ही करन्सी अवघ्या 24 तासात 45 टक्क्यांपर्यंत वधारली आहे.

24 तासात 45 टक्क्यांपर्यंत उसळी

गेल्या 24 तासात डॉगकॉईनच्या किंमतीत जवळपास 45% तेजी आली आहे. ही करन्सी सध्या $0.43614055 वर पोहचली आहे. अमेरिकेत ट्रम्प यांची सत्तेत वापसी झाल्यापासून या करन्सीत 145% तेजी दिसून आली. या नवीन दमाच्या चलनाने जगातील सर्वात जुनी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन आणि एथर यांना मागे टाकले आहे. तर दुसरीकडे बिटकॉईनचे बाजारातील मूल्य हे चांदीपेक्षा मोठे झाले आहे. बिटॉकाईनचे मार्केट कॅप 1.736 ट्रिलियन डॉलरवर पोहचले आहे. तर चांदी 1.735 ट्रिलियन डॉलरवर पोहचली आहे. तर डॉगकॉईन $55.69 बिलियन डॉलरवर आहे.

हे सुद्धा वाचा

जगातील आठवी संपत्ती

व्हर्च्युअल करन्सी बिटकॉईन ही आता जगातील आठवी सर्वात मोठी संपत्ती ठरली आहे. सोन्याचे मार्केट कॅप 15.742 ट्रिलियन डॉलर आहे आणि सोने हे जगातील सर्वात महागडी मालमत्ता आहे. तर बाजारात क्रिप्टोकरन्सी तेजीत आहे. मस्क याने अमेरिकेमधील निवडणुकीत डॉगकॉईन आणि ट्रम्प यांचे जाहीर समर्थन केले होते. मस्क याच्या संपत्तीत आणि चलनात मोठी वाढ झाली आहे. क्रिप्टो करन्सीत तेजीचे सत्र आहे. तिचे मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलरवर पोहचले आहे.

तेजीचे सत्र कायम राहणार?

तज्ज्ञांच्या मते, मस्क यांची फेव्हरेट क्रिप्टो करन्सी डॉगकॉईनमध्ये तेजीचे सत्र येऊ शकते. उलट ट्रम्प प्रशासन मस्क यांना एखादे मोठे पद सुद्धा देऊ शकते. अर्थात डॉगकॉईन अजूनही त्याच्या उच्चांकापेक्षा कमी व्यापार करत आहे. डॉगकॉईनचा सर्वकालीन उच्चांक हा मे 2021 मध्ये $0.7376 होता. ट्रम्प 2.0 मध्ये क्रिप्टो करन्सीसाठी अनुकूल नियम तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाजारात अजून उसळी येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.