GST Exemption items News | सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्यावर सोमवारपासून जादा बोजा पडला आहे. 18 जुलै 2022 पासून घरगुती वापराच्या अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी (GST On Essential Goods) लागू करण्यात आल्यामुळे फुडमॉल अथवा किराणा दुकानातून ग्राहकांना आता जादा दराने वस्तू खरेदी कराव्या लागतील. यामध्ये दैनंदिन वापरातील काही पॅकबंद (Packed) अन्नधान्य आणि खाद्यान्नाचा समावेश आहे. या वस्तूंमध्ये दही, ताक, पनीर, पीट, सोयाबीन, मटार, गहु आणि अन्य धान्य यांच्यावर आता 5 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. असे असले तरी सरकारने काही उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी हटविला (GST Exemption) आहे. रात्री उशीरा केंद्रीय अप्रत्यक्ष कर तथा सीमा शुल्क बोर्डाने (CBIC) काही वस्तूंवरील जीएसटी हटवला आहे. पण त्यासाठी अट घातली आहे. ही अट पूर्ण केली तरच या वस्तूंवर जीएसटी लागू होणार नाही. त्यामुळे या अटी आणि शर्तींवरच जीएसटी लागू होईल की नाही हे ठरेल. या अटी काय आहेत ते पाहुयात.
सोमवारपासून खाद्य वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. या वस्तूंवर 5 टक्के वस्तू व सेवा कर (GST) आकारण्यात येत आहे. सरकारने आता 25 किलोंपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंना वगळले आहे. यामध्ये विना ब्रँडवाल्या खाद्य वस्तू तसेच पीठ, डाळ आणि धान्ये यांसारख्या पाकीटबंद खाद्य वस्तू यांचा समावेश आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर तथा सीमा शुल्क बोर्डाने (CBIC) रविवारी याविषयीचा खुलासा केला. नागरिकांच्या मनात जीएसटीविषयी अनेक प्रश्न होते. त्यातच व्यापाऱ्यांनी जीएसटीला उघड विरोध केला. जीएसटीवरुन देशात संभ्रमाचं वातावरण लक्षात घेत, रविवारी रात्री उशीरा सीबीआयसीने प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नव्या जीएसटीबाबत शंकानिरसन केले आहे.
नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरील एका उत्तरात सीबीआयसीने म्हटले आहे की, पाकीटबंद वस्तूवरच 5 टक्के कर लागणार आहे. ज्या वस्तूंचे वजन 25 किलोपर्यंतच आहे, याच वस्तूंवर ग्राहकांना 5 टक्के कर द्यावा लागणार आहे.
किरकोळ व्यापारी जर उत्पादक तथा वितरकाकडून 25 किलोचे पाकीटबंद खाद्य साहित्य घेऊन सुटी विक्री करणार असेल, तर त्यावर जीएसटी लागणार नाही.
“The GST Council has exempt from GST, all items specified below in the list, when sold loose, and not pre-packed or pre-labeled. They will not attract any GST,” tweeted Union Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/pGh1ha8tUV
— ANI (@ANI) July 19, 2022
सीबीआयसी दिलेल्या निवेदनानुसार, धान्य, डाळी, पीठ यांचे 25 किलो अथवा 25 लिटरपेक्षा अधिकची पाकिटे, या पाकीटबंद अथवा लेबलच्या वस्तूंच्या श्रेणीत येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर जीएसटी लागणार नाही. म्हणजे आधीच पाकीटबंद असलेले 25 किलो पीठाच्या पाकिटावर जीएसटी लागेल. परंतू, 30 किलोच्या पाकिटावर जीएसटी लागणार नाही.
ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या ट्विटचा आधार घेऊन जीएसटीतून वगळण्यात आलेल्या वस्तूंची माहिती देण्यात आलेली आहे. त्यात म्हटल्यानुसार-
“जीएसटी कौन्सिलने जीएसटीमधून सूट दिली आहे, यादीत नमूद केलेल्या सर्व वस्तू, जेव्हा सूट्या प्रमाणात विकल्या जातात आणि या वस्तू प्री-पॅक केलेले किंवा प्री-लेबल केलेल्या नसतील तर त्यांना कोणताही जीएसटी लागू होणार नाही,” केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट केले आहे.