मुंबई : मेट्रोने प्रवास केल्याने आपण अगदी कमी वेळामध्ये पोहोचतो. विशेष म्हणजे वाहतूककोडींची देखील समस्या नसते. यामुळे आपला वेळही मोठ्या प्रमाणात वाचतो. म्हणून आता लोक मेट्रोने प्रवास करण्यावर अधिक भर देतात. मेट्रोने प्रवास करत असणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता तुम्ही रेल्वेच्या तिकिटप्रमाणेच घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने मेट्रोचे तिकीट बुक करू शकता. होय तुम्ही अगदी खरे ऐकले. तुम्ही घरी बसूनही आरामात मेट्रोचे तिकीट बुक करू शकता. विशेष बाब म्हणजे तुमचे तिकिट 24 तासांनंतर एक्सपायर देखील होणार नाहीये.
आपण RCTC वरून ज्याप्रमाणे चार महिने अगोदर तिकीट बुक करू शकतो, तशीच सुविधा मेट्रोला देखील मिळणार आहे. आता तुम्हाला मेट्रोनेही प्रवास करण्यासाठी 120 दिवस अगोदर तिकीट काढण्याची सुविधा मिळणार आहे. यातील सर्वात विशेष बाब म्हणजे तुम्ही काढलेले मेट्रोचे तिकीट हे चार दिवस वैध देखील ठरणार आहे. आता सध्या मेट्रोचे तिकीट दोन दिवसांसाठी वैध पकडले जाते. ही बातमी दिल्ली मेट्रो वाल्यांसाठी आहे.
मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला IRCTC च्या वेबसाइटवर किंवा ॲपवर जावे लागेल. IRCTC कडून मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वेच्या बुकिंग सिस्टममध्ये बदल केले जातील. क्यूआर कोडच्या मदतीने तुम्ही पैसे पे करू शकता. हेच नाहीतर त्या तिकीटाची प्रिंटआउट देखील तुम्ही मिळू शकता. सरळ आणि सोपा पर्याय म्हणजे मोबाईलमध्ये या तिकिटाची स्क्रीन शॉट देखील घेऊ शकता.
मेट्रो तिकीट बुकींग फक्त ज्या प्रवाशांकडे अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम असलेला मोबाईल आहे, त्यांनाच करता येईल. ज्यांच्याकडे आयफोन आहे, अशा प्रवाशांना अजून काही दिवस वाट पाहवी लागेल. आयफोन असलेल्यांना मेट्रो तिकीट मोबाईलवरून बुक करता येणार नाहीये. मेट्रो तिकीटचे ऑनलाईन पद्धतीने काढता येणार असल्याने तिकीट काढण्यासाठी आता रांगेत उभा राहण्याची गरज प्रवाशांना नसणार आहे. यामुळे मोठा दिलासा प्रवाशांना नक्कीच मिळणार आहे.