नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात भारतीय रेल्वे वंदे भारत, बुलेट ट्रेन, अत्याधुनिक रेल्वे ट्रॅक, विद्युतीकरण अशा अनेक योजनांमुळे सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. पण याच कालावधीत रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांचा हक्कच (Senior Citizen Rights) हिरावला आहे. एवढेच नाही तर हा हक्क मारून रेल्वेने कोट्यवधींची कमाई केली आहे. जेष्ठांच्या हक्काची सवलत नाकारात, त्यांच्याकडून तिकीटाची पूर्ण रक्कम वसुलीचा धडाका रेल्वेने (Indian Railway) सुरु केला. त्यातून रेल्वेने खोऱ्याने पैसा ओढला आहे. अर्थात केंद्र सरकारच्या या धोरणावर नागरिकांनी तोंड सूख घेतले आहे. पण रेल्वेने अद्यापही भूमिका बदलवलेली नाही. अनेकांनी रेल्वेचे ही कृती दात कोरुन पोट भरण्याचा प्रकार असल्याचा टोला हाणला आहे.
एकाच वर्षात रेकॉर्डब्रेक कमाई
मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेने हा प्रताप केला आहे. कोरोना कालावधीत रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलती काढून घेतल्या. रेल्वेने 1 एप्रिल 2022 से 31 मार्च 2023 या कालावधीत देशातील वयोवृद्धांकडून जमके कमाई केली. रेल्वेने त्यांच्याकडून जास्तीचे 2,242 कोटी रुपये उकळले. यापूर्वी ज्येष्ठांना रेल्वे तिकिटावर मोठी सूट देण्यात येत होती.
मार्च 2020 पासून बंदी
रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी भाडेसवलत बंद केली. कोविड काळात रेल्वेने ही सवलत खाऊन टाकली. मार्च 2020 पासून बंदी या सवलतीवर बंदी घालण्यात आली. त्यापूर्वी ही सवलत लागू होती. 60 वर्षांहून अधिक वयाच्या पुरुष आणि ट्रांसजेंडर यांच्यासाठी भाड्यामध्ये 40 टक्के तर 58 वर्षांवरील महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येत होती. ही सवलत सर्व श्रेणीच्या प्रवासाकरीता लागू होती.
माहिती अधिकारात खूलासा
मध्यप्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रेल्वेकडे याविषयीची माहिती मागितली होती. भारतीय रेल्वेने त्यांना माहिती दिली. त्यानुसार, 1 एप्रिल 2022 से 31 मार्च 2023 या काळात जवळपास 8 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. यामध्ये जवळपास 4.6 कोटी पुरुष, 3.3 कोटी महिला आणि 18,000 ट्रांसजेंडर्सचा समावेश होता. या सर्वांना यापूर्वी भाड्यामध्ये देण्यात येणारी सवलत नाकारण्यात आली.
ज्येष्ठांमुळे रेल्वे मालामाल
या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांमुळे रेल्वे मालामाल झाली. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांकडून एकूण 5,062 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये 2,242 कोटी रुपयांची अधिकच्या कमाईचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना भाड्याची सवलत नाकारून, ही कमाई करण्यात आली आहे.
2020-2022 दरम्यान जबरदस्त कमाई
आरआयटीतील माहितीनुसार, रेल्वेने मार्च 2020 ते 31 मार्च 2022 याकाळात 7.13 कोटी कोटी वयोवृद्धांना किराया, भाड्यामध्ये कुठलीही सवलत दिली नाही. यामध्ये 4.46 कोटी पुरुष, 2.84 कोटी महिला आणि 8,310 कोटी ट्रांसजेंडरचा समावेश आहे. या दरम्यान रेल्वेने वयोवृद्धांकडून 3,464 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली. पण रेल्वेने सवलत नाकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.