नवी दिल्ली : पडलं, झडलं, हातापायाला लागलं तर आईनंतर तीव्रतेने या ॲटिंसेप्टिक लिक्विडची (Antiseptic Liquid) आठवण हमखास येते. 93 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये ही कंपनी सुरु झाली. तेव्हा ही कंपनी प्रत्येक घरात आपलं आधिराज्य गाजवले असे कोणालाच वाटले नाही. हा ब्रँड लोकप्रियता आणि विश्वासाच्या आधारावर आज प्रत्येक घरात टिकून आहे. या ॲटिंसेप्टिक लिक्विडचा पूर्वी दवाखाने, रुग्णालयातच वापर होत होता. पण नंतर या कंपनीने अमुलाग्र बदल केला. त्यानंतर ही कंपनी घराघरात पोहचली. श्रीमंतापासून ते गरिबाच्या घरातही या ब्रँडचे ॲटिंसेप्टिक लिक्विड, साबण (Soap), हँडवॉश (Handwash) दिसून येते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत काँग्रेसच्या खासदारांना या ॲटिंसेप्टिक लिक्विडने तोंड साफ करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते आणि ब्रँडची ही मोठी चर्चा झाली होती.
इंग्लंडची कंपनी Reckitt ची स्थापना 1814 मध्ये झाली होती. या कंपनीने 1930 मध्ये आताच जागतिक ब्रँड डेटॉलची (Dettol) निर्मिती सुरु केली. Reckitt Benckiser हे या कंपनीचे मालक होते. पूर्वी सेप्सिस इंफेक्शन वाढल्याने प्रसुती दरम्यान महिलांचा मृत्यू ओढायचा. त्यामुळे Reckitt Benckiser यांनिी डेटॉलची निर्मिती केली होती. त्यांनी लागलीच फॅक्टरी स्थापली आणि उत्पादन सुरु केले.
सुरुवातीच्या प्रयोगात डेटॉल वापरण्याचा चांगला फायदा दिसून आला. सेप्सिसचा संसर्ग 50 टक्क्यांनी घसरला. सुरुवातीला या उत्पादनाचे नाव डीटॉक्स (Dettox) असे होते. यामध्ये क्लोरॉक्सीलॉन नावाचे रसायन आहे. शस्त्रक्रिया आणि त्वचा विकार, संसर्गासाठी याचा वापर होतो. पूर्वी डेटॉलचा वापर जंतूनाशक (Antiseptic Liquid) म्हणून रुग्णालय आणि दवाखान्यात करण्यात येत होता.
प्रसुतीनंतर आई आणि बाळाला सेप्सिस रोगाच्या प्रार्दूभावापासून वाचविण्यासाठी या औषधाचा वापर वाढला. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले. तसेच आईच्या मृत्यचे प्रमाण कमी झाले. त्वचा विकार, संसर्ग टाळण्यासाठी डेटॉलचा वापर वाढला. डीटॉक्सचा नाव बदलून डेटॉल करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात डेटॉलने अनेक सैनिकांना संसर्गापासून वाचविले. त्यांचा मृत्यू टळला.
1936 मध्ये डेटॉल भारतात आले. 1945 मध्ये डेटॉलने पुण्यात काराखाना सुरु केला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु केले. देशात डेटॉलची विक्री प्रचंड वाढली. त्यानंतर डेटॉलने घरगुती उत्पादनात प्रवेश केला. साबण, हँडवॉश यासह इतर उत्पादने बाजारात आणली.
डेटॉलचे जागतिक विक्रीत 62 टक्के वाढ झाली. आकडेवारीनुसार, 1980 मध्ये देशातील 62 दशलक्ष लोक डेटॉलचा वापर करत होते. कोणते ही ॲटिंसेप्टिक लिक्विड मागताना आजही डेटॉल या नावानेच मागणी होते, इतके ते लोकांच्या अंगवळणी पडले आहे. जगभरातील 120 देशांमध्ये डेटॉलची विक्री करण्यात येते.