Rekha Jhunjhunwala : अवघ्या 10 मिनिटात बंपर लॉटरी! या स्टॉकमुळे 233 कोटींची कमाई

| Updated on: Apr 20, 2023 | 4:35 PM

Rekha Jhunjhunwala : कोणाचं नशीब कधी आणि कसं उघडेल सांगताच येत नाही. जागतिक श्रीमंत महिलांच्या यादीत नाव झळकावणाऱ्या रेखा झुनझुनवाला यांना आणखी एक बंपर लॉटरी लागली आहे.

Rekha Jhunjhunwala : अवघ्या 10 मिनिटात बंपर लॉटरी! या स्टॉकमुळे 233 कोटींची कमाई
Follow us on

नवी दिल्ली : कोणाचं नशीब कधी आणि कसं उघडेल सांगताच येत नाही. जागतिक श्रीमंत महिलांच्या यादीत नाव झळकावणाऱ्या रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना आणखी एक बंपर लॉटरी लागली आहे. त्यांचे पती राकेश झुनझुनवाला हे भारतीय शेअर बाजारात बिग बुल (Share Market Big Bull) म्हणून परिचीत आहे. त्यांना भारतीय वॉरने बफे असे सुद्धा म्हणतात. त्यांनी रेखा झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ तयार करुन ठेवला होता. गुरु राकेश झुनझुनवाला यांच्या नंतर रेखा झुनझुनवाला यांनी पण गुंतवणूक सुरुच ठेवली. त्यांनी काही नवीन कंपनीत पण गुंतवणूक केली. तर यापूर्वीच्या गुंतवणुकीत भर घातली. त्याचा त्यांना जोरदार फायदा झाला. अवघ्या 10 मिनिटात त्यांना बंपर लॉटरी (Bumper Lottery) लागली. या कंपनीने त्यांना 233 कोटींची कमाई करुन दिली.

टायटनमुळे बंपर लॉटरी
रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये शेअरहोल्डिंग वाढवली होती. त्यांनी आणखी शेअर खरेदी केले होते. त्यांचा हा निर्णय एकदम पथ्यावर पडला. गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सुरुवातीच्या 10 मिनिटांत रेखा झुनझुनावाला टायटनने जबरदस्त परतावा मिळून दिला. त्यांना अवघ्या 10 मिनिटांत 233 कोटी रुपायांचा फायदा झाला. कंपनीचा शेअर आज सकाळी 10 मिनिटांत 2,619 रुपयांवर पोहचला. हा या शेअरचा उच्चांक होता. 10 मिनिटांत या कंपनीचा प्रति शेअर 49.70 रुपये वाढला. एकूण संपत्तीत याची वाढ दिसून आली.

233 कोटींचा फायदा
जानेवारी ते मार्च 2023 तिमाहीत टायटन कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनावाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,69,45,970 शेअर आहे. टायटन कंपनीत त्यांचा 5.29 टक्के वाटा आहे. टायटन यांच्या कंपनीचा प्रति शेअर 49.70 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे रेखा झुनझुनवाला यांना 2,33,32,14,709 रुपये म्हणजे जवळपास 233 कोटी रुपयांचा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

शेवटच्या तिमाहीत वाढला हिस्सा
Q4FY23 मध्ये टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटामध्ये रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा समूहच्या टायटन कंपनीचे 4,69,45,970 शेअर होते. हा वाटा 5.29 टक्के आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 4,58,95,970 शेअर म्हणजे 5.17 टक्के हिस्सा होता. रेखा झुनझुनावाला यांनी जानेवारी ते मार्च 2023 मध्ये टायटन कंपनीत 0.12 टक्के हिस्सा वाढवला. त्यांनी Q4FY23 मध्ये टायटन कंपनीचे 10.50 लाख शेअरची खरेदी केली होती.

टायटनची जोरदार कामगिरी
गेल्या एक महिन्यात टायटनच्या शेअरची किंमत जवळपास 2460 रुपयांहून 2590 रुपये प्रति शेअर झाला. यादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के वाढ झाली. या वर्षी 2023 मध्ये टाटा समूहाच्या या स्टॉकमध्ये केवळ एक टक्केच वाढ झाली. गेल्या वर्षी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ स्टॉक 2480 रुपयांहून 2590 रुपये प्रति शेअर पोहचला. यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली.