Mukesh Ambani : पगार घेत नाहीत, शेअर विकत नाहीत, मग मुकेश अंबानी यांचं घर चालतं तरी कसं?

| Updated on: Aug 10, 2023 | 10:37 AM

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गेल्या तीन वर्षांपासून पगार घेतलेला नाही. मग त्यांचा घरचा खर्च, घर कसं चालतं असेल असा प्रश्न काहींना नक्कीच पडला असेल, त्याचं काय बरं उत्तर असेल? जाऊ द्या अंदाज तरी वर्तविता येईल का?

Mukesh Ambani : पगार घेत नाहीत, शेअर विकत नाहीत, मग मुकेश अंबानी यांचं घर चालतं तरी कसं?
Follow us on

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे तीन वर्षांपासून विना वेतन काम करत आहे. वेतनच नाही तर इतर कोणतेच अनुषांगिक लाभ ही ते घेत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. रिलायन्सच्या वार्षिक अहवालात ही बाब समोर आली. सलग तिसऱ्या वर्षी मुकेश अंबानी यांनी पगार (No Salary) घेतला नसल्याचे अहवालात समोर आले. इथं तर आपल्याला पगार महिनाभर पुरत नाही. तो कमी पडतो. तिथे वेतनासह कोणतेचे लाभ न घेणारे मुकेश अंबानी यांचे घर चालत तरी कसं असेल, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यांच्या घराचं बजेट बिघडलं नसेल का? त्यांची जीवनशैली पाहता हा खर्च भागविण्यासाठी ((Household Expenses) त्यांना काही तर कमाईचे साधन असेल की नाही? असे अनेक प्रश्न समोर येतात. याविषयी काही तज्ज्ञांनी त्यांची मते मांडली आहे. त्यातून त्यांच्या कमाईचा एक अंदाज वर्तवता येऊ शकतो.

कोरोनापासून नो सॅलरी

रिलायन्सच्या वार्षिक अहवालानुसार, समूहाचे चेअरमन गेल्या तीन वर्षांपासून कोणतेही वेतन घेत नाहीत. कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर जून 2020 पासून त्यांनी वेतन घेतले नाही. 2008-09 ते 2019-20 पर्यंत त्यांनी 15 कोटी वेतन घेतले. गेल्या 12 वर्षांत त्यात बदल झाला नाही. त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्यापेक्षा अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

श्रीमंतांच्या यादीत कुठे?

मुकेश अंबानी यांना वेतनासह त्यांना सर्व प्रकारचे भत्ते, सेवानिवृत्तीचा लाभ, कमीशन, स्टॉक ऑपशन्सचे लाभ, अनुषांगिक भत्ते इतर लाभ देण्यात येत होते. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, अंबानी यांची एकूण संपत्ती 95.1 अब्ज डॉलर इतकी आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत ते सध्या 11 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 7.96 अब्ज डॉलरची वाढ झाली.

मग घर चालते तरी कसं

मुकेश अंबानी गेल्या तीन वर्षांपासून वेतनच नाही तर कोणतेच लाभ घेत नाहीत. मग त्यांचे घर चालते तरी कसे? इतका खर्च भागतो तरी कसा, त्यांची कमाई कशी होते, असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यावर गुंतवणूक तज्ज्ञ नितीन केडिया यांनी ललनटॉपला माहिती दिली. अंबानी पगार घेत नसले तरी कंपनीच्या लाभांशातून होणार फायदा, IPL टीम मुंबई इंडियन्समधून कमाई, त्यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीचा फायदा त्यांना होतो.

लाभांश म्हणजे काय

कंपनी दरवर्षी फायदा शेअरधारकांमध्ये वाटते. त्यालाच लाभांश (Dividend) असं म्हणतात. समजा, कंपनीला 200 रुपयांचा फायदा झाला तर त्यातील 100 रुपये उद्योग वाढीसाठी राखून ठेवले जातात. तर 100 रुपये शेअरधारकांमद्ये वाटप होतात.

अंबानी कुटुंबियांकडे किती शेअर

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आकड्यानुसार, अंबानी कुटुंबियांसह प्रमोटर्सकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 50.39 टक्के वाटा आहे. शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण 6,76,57,88,990 म्हणजे 6 अब्ज 76 कोटी 57 लाख 990 शेअर आहेत. त्यातील 50.39 टक्के वाटा बाजूला काढला तर अंबानी कुटुंबियासह प्रमोटर्सकडे एकूण 3,32,27,48,048 शेअर्स म्हणजे 3 अब्ज 32 कोटी 27 लाख 48 हजार 48 शेयर आहेत.

किती झाला फायदा

केडिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज प्रत्येक वर्षी साधारणपणे 6.30- 10 रुपये प्रति शेअर लाभांश देते. त्याआधारे प्रमोटर्स दरवर्षी अंदाजे 2 ते 3 हजार कोटी रुपयांची कमाई करतात.

असाही मिळतो फायदा

अंबानी कुटुंबियांव्यतिरिक्त अनेक खासगी फर्म या रिलायन्सच्या प्रमोटर्स आहेत. अर्थात या कंपन्या मुकेश अंबानी यांच्या आहेत. त्यामध्ये मुकेश अंबानी यांची गुंतवणूक आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे लाभांशाचा फायदा, या खासगी फर्म मार्फत मुकेश अंबानी यांनाच मिळत आहे. अंबानी कुटुंबियांकडे रिलायन्समध्ये व्यक्तिगत 0.84 टक्के हिस्सेदारी आहे.

काय आहे दावा

याविषयीच्या वृत्तात केलेल्या दाव्यानुसार, कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रति शेअर 9 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. त्यामाध्यमातून मुकेश अंबानी यांना 7.2 कोटींचा फायदा झाला. तर इतर खासगी फर्मच्या माध्यमातून पण त्यांना फायदा झाला. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात अंबानी कुटुंबियांना 2022-23 मध्ये अंदाजे 2 हजार 990 कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळेच वेतन घेत नसले तरी अंबानी यांच्या घरचे बजेट कोलमडत नाही.