नवी दिल्ली : बँक एका विशिष्ट आणि ठराविक वेळेतच (Bank Timings) सुरु असतात. सध्यातरी असंच आहे. पण लवकरच बँका आठवड्याचे सातही दिवस आणि चोवीस तास सुरु राहणार आहेत. त्याअनुशंगानं आता आरबीयानं (RBI) पावलं टाकायलाही सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात (Centre Budget 2022) बँकांच्या 24 तास आणि सातही दिवसांच्या कामाचा मुद्दा नमूद करण्यात आला होता. त्यानंतर आता आरबीआयकडून या धर्तीवर बँका सुरु करण्यासाठी पुढील पावलं उचलली जात आहेत. जनधन बँक अकाऊंटनतर आता चोविस तास लोकांना बँकिंग सेवांचा लाभ घेता येऊ शकेल. अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँक युनिट्स अर्थात DBU उघडण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता या DBU साठी गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत.
आरबीआयनं जारी केलेल्या गाईडलाईन्स देशातील सर्व व्यावसायिक बँकांनाही लागू असणार आहेत. यात ग्रामीण बँक, पेमेन्ट्स बँख आणि लोकल बँकांना वगळण्यात आलंय. डिजिटल बँकिंग युनिट्स नेमकं आहे काय आणि त्याचा नेमका फायदा कुणाला होणार आहे, हे समजून घेऊयात…
DBU म्हणजेच डिजिटल बँकिंग युनिट्स! गेल्या काळात ATM शब्द आणि त्याची सेवा जशी सर्वसामान्यांमध्ये रुजली, त्याचप्रमाणे येत्या काळात DBU ही प्रचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच धर्तीवर आता प्रयत्न सुरु कऱण्यात आले आहे. आरबीआयनं डीबीयूबाबत आपल्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. डीबीयू नेमक्या कशा असतील? त्या सर्वसामान्य बँकेसारख्या असतील की वेगळ्या असतील? याबाबत आता लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
डिझाईन आणि फॉरमॅटचा विचार करता डीबीयू हे सामान्य बँकेसारखे नसतील. त्याचं डिझाईन हे विशिष्ट प्रकारचं असते. तिथं प्रामुख्यानं डिजिटल बँकिंग युजर्ससाठीच्या सेवांचा लाभ मिळेल, असं सांगितलं जातंय.
डीजीटल बँकिंग युनिट्समध्ये नेमकं काय काय असेल याची माहिती आरबीआयनं आपल्या गाईडलाईन्समध्ये जारी केली आहे. खालील गोष्टी डीबीयूमध्ये असतील. ज्यांचा वापर ग्राहकांना आपल्या दैनंदिन बँक व्यवहारांसाठी करता येऊ शकेल.
डिजिटल बँकिंग युनिट्समध्ये ग्राहक स्वतःच स्वतःचं खातंही उघडू शकणार आहे. तसंच बँकिंगशी संबंधित सर्व कामं ग्राहक स्वतःच करु शकतील. सेल्फ सर्विससोबत या डीबियूमध्ये कर्मचारीही असतील. ग्राहकांना एखादी गोष्ट कळली नाही, तर त्यांना ती समजावून सांगण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कर्मचारीही या डीबीयूमध्ये असतील. आगामी काळाता आता अशाप्रकारच्या बँकिंग सेवांसाठी लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.