नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतीच डिजिटल रुपयाची (e₹-R) सुरुवात केली आहे. त्याचा उपयोग दुकानदारांना पैसे देण्यापासून बिल अदा करण्यासाठी करण्यात येणार आहे. डिजिटल रुपया (Digital Rupees) एका वैध कारणासह बाजारात उतरविण्यात आले आहे. डिजिटल टोकनच्या (Digital Token) रुपात हे काम करते. केंद्रीय बँक सध्या डिजिटल रुपयाची निर्मिती, त्याचे वितरण आणि सार्वजनिक वापराबाबतची प्रक्रिया मजबूत करण्याचे काम करणार आहे.
सार्वजनिक बाजारात हे चलन आल्यानंतर त्याचा उपयोग बिल अदा करण्यापासून इतर अनेक व्यवहारात करण्यात येणार आहे. याचा व्यवहार करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन (QR Code Scan) करावा लागणार आहे. डिजिटल रुपया (e₹-R) बँकेच्यावतीने जारी करण्यात येणार आहे.
RBI ने दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल रुपयाचा वापर (Digital Rupees Use) बँकेचे वॉलेट आणि मोबाईल अॅपद्वारे करण्यात येणार आहे. डिजिटल रुपया बँकेत भारतीय चलनाच्या रुपात जमा करता येईल. त्याला मान्यता देण्यात आली आहे.
मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, गुंतवणुकीसाठी या चलनाचा वापर होतो का? म्हणजे मुदत ठेव, आवर्ती ठेव योजनेसाठी या चलनाचा वापर होईल का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बचत खात्यात हे (Deposit in Saving Account) चलन जमा करुन तुम्हाला व्याज कमाविता येणार नाही.
डिजिटल रुपयाला भारतीय चलनासारखाची मान्यता आहे. चलनी नोटांच्या मूल्याप्रमाणेच त्याच्या डिजिटल टोकन रुपाला मान्यता देण्यात आली आहे. व्याजाचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र तुमच्या पदरी निराशा येऊ शकते. कारण डिजिटल रुपयावर व्याज मिळत नाही.
नगदी चलनाप्रमाणे, रोखीवर तुम्हाला व्याज कमाविता येते. बँकेतील खात्यातून एफडीतून व्याज मिळविता येणार नाही. डिजिटल रुपया डिजिटल वॉलेटमध्ये जमा केल्यास त्यावर कुठलेही व्याज मिळणार नाही. त्यामुळे याविषयीचा निर्णय तुम्हाला निराश करणारा आहे.
केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत 13 डिसेंबर, 2022 रोजी याविषयीचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानुसार, डिजिटसल रुपया वॉलेटमध्ये हस्तांतरीत करता येईल. या जमा डिजिटल रुपयावर व्याज कमवू शकत नाही. परंतु, येत्या काळात याविषयीचा निर्णय होऊ शकतो.