देशाची सर्वात मोठी बॅंक SBI ची दिवाळी भेट, लोन स्वस्त झाले

| Updated on: Oct 15, 2024 | 9:05 PM

भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) ने 15 ऑक्टोबर 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत एमसीएलआरमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयच्या एका एमसीएलआर टेन्युअरच्या व्याज दरात 25 बेसिस पॉईंटने कपात केलेली आहे. तर इतर टेन्युअर दरात कोणताही बदल केलेला नाही.

देशाची सर्वात मोठी बॅंक SBI ची  दिवाळी भेट, लोन स्वस्त झाले
Follow us on

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ऑक्टोबरच्या महिन्यात रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाही.परंतू रिझर्व्ह बॅंकेने व्याज दरात कपातीचे संकेतही दिले होते. तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने आरबीआयची वाट न पाहाता आपल्या एमसीएलआर दरात कपात केली आहे. याचा अर्थ एसबीआयने आपल्या व्याज दरात कपात केली आहे. याचा परिणाम गृहकर्ज आणि दुसऱ्या रिटेल कर्जांवर होणार आहे. चला तर पाहूयात अखेर या सरकारी बॅंकेने आपल्या व्याजदरात किती कपात केली आहे.?

एसबीआयने एमसीएलआर दरात केला बदल

भारतीय स्टेट बॅंकेने 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत एमसीएलआर मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने एक एमसीएलआर टेन्युरच्या व्याज दरात 25 बेसिस पॉईंटची कमी केली आहे. तर इतर टेन्युर दरात कोणताही बदल केलेला नाही. रिवाईज्ड एमसीएलआर 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाला आहे.एमसीएलआर बेस्ड व्याज दरांना 8.20 टक्के ते 9.1 टक्क्यांच्या घरात एडजस्ट केले आहे, ओव्हरनाईट एमसीएलआर 8.20 टक्के आहे. तर एक महिन्यासाठीचे दर 8.45 टक्क्यांवरून घटवून 8.20 टक्के केले आहेत, त्यात 25 बीपीएस घसरण झाली आहे. सहा महिन्यांच्या एमसीएलआर 8.85 टक्के निर्धारीत केला आहे. एक वर्षांचा एमसीएलआरला बदलून 8.95 टक्के केले आहे. तर दोन वर्षांच्या एमसीएलआर 9.05 टक्के आणि तीन वर्षांचा एमसीएलआर 9.1 टक्के आहे.

कार्यकाळसध्याचा एमसीएलआर (%)नवा एमसीएलआर (%)
ओव्हर नाईट8.2 8.2
एक महिना8.458.2
तीन महिने 8.58.5
सहा महिने 8.858.85
एक वर्ष 8.958.95
दोन वर्ष 9.059.05
तीन वर्ष 9.19.1

एमसीएलआर म्हणजे काय ?

एमसीएलआरला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट असेही म्हटले जाते. हा असा किमान व्याजाचा दर आहे. ज्यावर बॅंका आपल्या ग्राहकांना लोन देऊ शकतात. एमसीएलआर एक इंटर्नल बेंचमार्क असून त्याचा वापर बॅंका कर्जावरील व्याजदर निश्चित करण्यासाठी करतात. सध्या एसबीआयचा बेस रेट 10.40 टक्के आहे. जो 15 सप्टेंबर 2024 पासून लागू आहे. जर एसबीआयच्या बेंचमार्क प्राईम लेंडींग रेट म्हणजे बीपीएलआरचा चर्चा करायची तर तो 15 सप्टेंबर 2024 रोजी शेवटचा रिव्हाईस केला होता आणि तो प्रतिसाल 15.15 टक्के आहे.