नवी दिल्ली : रशिया -युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) भडकल्यानंतर पश्चिमी देशांसह अमेरिकेने रशियावर आर्थिक प्रतिबंध घातले. अशावेळी भारत रशियाच्या पाठिशी उभा ठाकला आहे. भारत रशियाच्या मैत्रीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. रशियाकडून कच्चा तेलात (Crude Oil )भारताने आघाडी घेतली आहे. पश्चिमी देशांचा दबाव झुगारुन भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत आहे. रशियाकडून स्वस्तात इंधन मिळत असल्याने भारताने अमेरिकेकडून (America) करण्यात येणारी तेल आयात घटवली आहे. फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक तेल खरेदी करण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) प्रत्येक दिवशी 16 लाख बॅरल कच्चे तेलाची आयात केली आहे. या दोस्तीमागील व्यवहाराचे गणितही महत्वाचे आहे.
शीतयुद्धानंतरच्या अमेरिकेने खेळलेल्या भारतविरोधी आणि पाकिस्तानला मदत करणाऱ्या खेळीत रशियाने भारताला चांगलीच मदत केली होती. बांगलदेश मुक्ती संग्रामात भारताला रशियाने मोठी मदत केली होती. पण भारतावर रशियाने दबाव टाकलेला नाही. अमेरिकेसोबतच्या भारताच्या संबंधावर कसालाही परिणाम झाला नाही. एप्रिल-डिसेंबर या काळात रशियाकडून आयात केलेल्या कच्चा तेलाची सरासरी किंमत 99.2 डॉलर प्रति बॅरल आहे. फारतर या किंमतीत 101.2 डॉलर प्रति बॅरलची वाढ झाली आहे. गेल्या नऊ महिन्यात जवळपास 2 डॉलर प्रति बॅरलची सवलत भारताला मिळत आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर पश्चिमी देशांसह अमेरिकेने प्रतिबंध घातला आहे. भारत रशियाकडून सातत्याने कच्चे तेल आयात करत आहे. आयात-निर्यातीवर नजर ठेवणारी संस्था वर्टेक्साच्या मते, भारत प्रत्येक दिवशी जेवढे कच्चे तेल आयात करतो, त्यातील एक तृतीयांश पुरवठा एकटा रशिया करत आहे. सलग पाच महिन्यांपासून रशिया सर्वाधिक तेल निर्यात करत आहे. रशिया-युक्रेन युद्ध भडकले, त्यावेळी फेब्रुवारी 2022 मध्ये रशियातून एक टक्क्यांहून कमी तेल आयात करण्यात येत होती. या फेब्रुवारी महिन्यात 35 टक्के वाढ झाली आहे. 16.20 लाख बॅरल प्रति दिन तेल आयात करण्यात येत आहे. रशियाकडून तेल आयात होत असल्याने सौदी अरब आणि अमेरिकेच्या आयातीवर त्याचा थेट परिणाम होत आहे. सौदी अरबच्या तेल आयातीत 16 टक्के घट तर अमेरिकेकडून होणाऱ्या तेल आयातीत 38 टक्क्यांची घट आली आहे.
भारत यापूर्वी इराक आणि सौदी अरबकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करत होता. पण रशियाकडून तेल आयातीत नवीन रेकॉर्ड तयार झाला आहे. या दोन्ही देशांकडून भारताने इतक्या वर्षात तेलाची जी आयात केली, त्यापेक्षा रशियाकडून अधिक प्रमाणात तेल आयात करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात इराककडून 9,39,921 बॅरल प्रतिदिवस, सौदी अरबकडून 6,47,813 बॅरल प्रतिदिवस तेल आयात करण्यात आली. तर संयुक्त अरब अमिरातकडून 4,4570 बॅरल प्रतिदिवस तेलाची निर्यात करण्यात आली. तर अमेरिकेकडून भारताने प्रति दिवस 2,48,430 बॅरलची आयात केली आहे.
कच्चा तेलाच्या आडून भारताने सक्षम परराष्ट्र धोरणाच धाक आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखविला आहे. भारत कोणाच्याही दावणीला बांधालेला नाही, हा मोठा संदेश देण्यात भारत यशस्वी ठरला आहे. तर फारसा फायदा हाती लागत नसला तरी थोड्या फार प्रमाणात भारतीय तेल विपणन कंपन्यांना यातून फायदा होत आहे.