Petrol Diesel Price : कच्चा तेलात सातत्याने घसरण दिसत आहे. कच्चे तेलाच्या किंमती गेल्या दोन महिन्यांपासून जास्त वाढलेल्या नाहीत. पण या किंमतीत घसरण सुरुच आहे. शुक्रवारी, 10 मार्च रोजी पण भावात घसरण झाली. तुमच्या शहरात त्याचा काय परिणाम दिसून आला.
Ad
Follow us on
नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने नरमाई आली आहे. या किंमतीत चढउतार होत आहे. कच्चे तेलाच्या किंमती (Crude Oil) गेल्या दोन महिन्यांपासून जास्त वाढलेल्या नाहीत. पण या किंमतीत घसरण सुरुच आहे. शुक्रवारी, 10 मार्च रोजी पण भावात घसरण झाली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) मध्ये 0.28 टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकन तेलाचा भाव आता 75.42 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude Oil) किंमतीत मोठी घसरण झाली. आज भाव 1.10 टक्क्यांनी घसरुन 81.56 डॉलर प्रति बॅरलवर विक्री होत आहे. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) मोठा बदल झाला होता. त्यावेळी उत्पादन शुल्क कपात करण्यात आले होते. त्यानंतर मात्र मोठा बदल झालेला नाही.
सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल, संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना प्रत्येक बॅरलमागे 2 डॉलरचा फायदा झाला आहे.