मुंबई : अलीकडे लोकांना छोट्या छोट्या गरजांसाठी कर्ज काढावं लागतं. घरासाठी, गाडीसाठी, लग्नासाठी किंवा खासगी कर्ज सहज उपलब्धही होते. विशेष म्हणजे कर्ज घेताना तुम्हाला कोणतीही गोष्ट किंवा वस्तू गहाण ठेवावी लागत नाही. तसेच मिळालेल्या कर्जाची रक्कम संबंधित व्यक्ती कशीही खर्च करु शकते. पण बँकेतून कर्ज काढताना काही कागदपत्रे आवश्यकअसतात. ही कागदपत्रे नसतील, तर तुम्हाला कर्ज काढण्यास अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
त्याशिवाय बँक किंवा एनबीएफसी (Non Banking Financial Company) या फक्त कर्ज परत करणाऱ्या आणि विश्वासू व्यक्तीलाच कर्ज देतात. त्यामुळे तुम्ही जर कर्जासाठी अर्ज केला असेल आणि तो मंजूर व्हावा असे तुम्हाला वाटतं असेल तर, त्यात तुमच्या जोडीदाराचा (नवरा/बायको) तपशीलही जोडा. यामुळे तुमच्या अर्जात उत्पन्नाची रक्कम वाढेल आणि तुम्हाला कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
तुम्ही याआधी कोणते कर्ज काढले असेल, तर त्याची आधी परतफेड करा आणि त्यानंतरच नवीन कर्जाबाबत प्रक्रिया सुरु करा. त्याशिवाय कर्ज काढण्याआधी तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच तुमचा क्रेडिट स्कोर कमी असल्यास कर्जासाठी इतर एनबीएफसी बँकेला तुम्ही संपर्क करु शकता.