नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2003 : प्रसिद्ध पिझ्झा कंपनी डोमिनोने ( Domino’s ) भारतीय बाजाारातील आपल्या पिझ्झाचे दर सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. डोमिनो पिझ्झाने भारतीय बाजारातील लार्ज पिझ्झाच्या किंमती लगभग अर्ध्यावर केल्या आहेत. Tossin, GoPizza, Leo’s Pizzeria, MojoPizza, Ovenstory आणि La Pino’z अशा कंपन्यांच्या प्रवेशाने भारतीय बाजारात पिझ्झा कंपन्यात मोठी स्पर्धा वाढली आहे. पिझ्झाच्या छोट्या आणि नवीन प्रतिस्पर्धी कंपन्यांमुळे ही स्पर्धा वाढली आहे.
डोमिनो पिझ्झाच्या किंमतीत झालेली घसरण ही फास्ट मुव्हींग कंज्युमर गुड्स ( FMCG ) सेक्टरच्या बदलत्या ट्रेंडला दर्शवित आहे. येथे छोट्या कंपन्या मोठ्या ब्रँडला टक्कर देत आहेत. तर काहींनी बाजारात मोठ्या ब्रँडला ओव्हरटेक केले आहे. हा ट्रेंड QRS ( क्वीक सर्व्हीस रेस्टॉरंट ) इंडस्ट्रीपर्यंत पोहचला आहे. या इंडस्ट्रीज डोमिनो एक मोठी प्लेअर आहे. त्यामुळे बाजारात रहाण्यासाठी कंपनीने दर बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनूसार डोमिनोने गेल्याच आठवड्यात आपल्या सब्सक्राईबर्सना मॅसेज करून लार्ज पिझ्झाची किंमत आता कमी केल्याचे कळविले आहे. बातमीत म्हटले आहे की लार्ज व्हेजेटेरियन पिझ्झाची किंमत 799 रुपयांवरुन आता जवळपास निम्मी म्हणजे 499 रुपये केली आहे. तसेच नॉन-वेज लार्ज पिझ्झाची किंमत 919 रुपयांवरुन घटवून आता 549 रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एकदम स्वस्तात पिझ्झाचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे.
लार्ज पिझ्झाच्या किंमतीत कमी करण्याबरोबरच आता डोमिनोज इंडीयाने ज्यादा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एवरीडे वॅल्यू ऑफरही आणली आहे. Howzzat50 ऑफरद्वारे ग्राहकांना आता पिझ्झावर 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.