मार्च महिना संपण्यासाठी आता केवळ काही दिवस उरले आहेत. यासह अनेक महत्वाची कामांसाठीची अंतिम मुदत पण संपणार आहे. मार्च महिना आयकर आणि करदात्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. 31 मार्च रोजी चालू आर्थिक वर्षाची अंतिम मुदत संपत आहे. यामध्ये ITR-U म्हणजे अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची डेडलाईन समाप्त होत आहे. जर होळीच्या गडबडीत तुम्ही अपडेटेड ITR भरला नाही तर तुमच्यासाठी ही विलंब महागात पडू शकतो. प्राप्तिकरदात्याला त्यासाठी 200 टक्क्यांपर्यंत दंड चुकवावा लागू शकतो.
काय आहे अपडेटेड आयटीआर?
आयकर खाते करदात्यांना चूक सुधारण्यासाठी संधी देते. त्यासाठी ITR-U ची व्यवस्था करण्यात आली आहे. जर तुमच्या जुन्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये काही चुकीची माहिती दिली असेल अथवा काही उत्पन्नाचे स्त्रोत सांगण्यास विसरला असाल तर अपडेटेड रिटर्न फाईल करुन ही चूक सुधारता येते. जर तुम्ही यापूर्वी रिटर्न दाखल केला नसेल तर तुम्हाला अपडेटेड रिटर्न द्वारे नवीन रिटर्न दाखल करता येतो.
केव्हापर्यंत आहे मुदत ?
अपडेटेड रिटर्न भरण्यासाठी अंतिम तारीख 31 मार्च असते. अद्ययावत रिटर्नचा वापर करुन करदाते संबंधित मूल्यांकन वर्षांपासून 2 वर्षांपर्यंत या रिटर्नमध्ये सुधारणा करु शकतात. 31 मार्च 2024 रोजी अंतिम मुदत संपत आहे. ही अंतिम मुदत आर्थिक वर्ष 2020-21 चे 2021-22 मूल्यांकन वर्षासाठी अद्ययावत आयकर विवरणपत्र भरण्यास पात्र आहे.
लागतो किती दंड
अद्ययावत आयकर रिटर्न भरण्याची सुविधा 1 एप्रिल 2022 रोजीपासून सुरु झाली आहे. करदात्यांसाठी ही योग्य संधी आहे. जर जुन्या आयटीआरमध्ये काही माहिती भरणे बाकी असेल वा प्राप्तिकर नियमांनुसार रिटर्न फाईल करण्याची आवश्यकता असताना, तसे फाईल करता आले नसेल, तरी ही संधी आहे. ही शेवटची संधी सोडणे नुकसानदायक ठरते. जर यानंतर तुम्ही आयकर खात्याच्या पंजात अडकलात तर करपात्र रक्कमेपेक्षा 200 टक्के दंड तुमच्याकडून वसूल करण्यात येतो.
दंडासहित फाईल करा ITR-U
अद्ययावत रिटर्न भरण्यासाठी करदात्याला जोरदार दंड भरावा लागू शकतो. संबंधित मूल्यांकन वर्ष संपण्यापूर्वीच्या 12 महिन्यांच्या आत अपडेटेड रिटर्न दाखल करण्यासाठी व्याजासहित अतरिक्त कर द्यावा लागतो. 12 महिन्यानंतर 2 वर्षांपूरमवी अपडेटेड रिटर्न भरण्यासाठी 50 टक्के अतिरिक्त कर भरावा लागतो. आर्थिक वर्ष 2020-21 वा मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी अपडेटेड रिटर्न भरणाऱ्या करदात्यांनी 31 मार्च 2024 रोजीपर्यंत 50 टक्के जादा कर भरावा लागू शकतो. तसेच चूक सुधारता येते. नवीन आयटीआर फाईल करता येते.