गेल्या काही वर्षांपासून कोरोना आणि नंतर महागाईने सर्वसामान्यांची बचत खाल्ली. आता ही महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. खर्च जास्त आहे. विविध आजारावरील उपचार तर एकदम महागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य आरोग्य विमा घेण्याचा सर्वाधिक प्रयत्न करतो. त्याआधारे त्याला इलाज करता येतो. पण अनेकदा आरोग्य विमा नसल्याने चांगले पण महागडे इलाज घेताना अडचण येते. नातेवाईक, मित्र यांची आर्थिक ओढताण आपल्याला माहिती असल्याने त्यांच्याकडे आपण मदत मागत नाहीत. अशावेळी कॅनेरा बँकेने एक मध्यममार्ग शोधला आहे. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कॅनेरा बँक मदतीला धावली
कॅनेरा बँकेने रुग्णालयातील खर्च भागविण्यासाठी कर्ज देण्याची योजना सुरु केली आहे. हा नवीन पर्याय बँकेने आणला आहे. बँकेने कॅनरा हील नावाने आरोग्यासाठी कर्ज योजना आणली आहे. या योजनेमुळे लागलीच जमापुंजी संपणार नाही. तसेच गरजेच्यावेळी ग्राहकाला कर्ज सुविधा मिळेल. त्यामुळे उपचारादरम्यान काही रक्कम कमी पडत असेल तर ही आरोग्य कर्ज योजना मदतीला येऊ शकते.
कर्जाचे दोन प्रकार
रुग्णालयातील खर्च पूर्ण करण्यासाठी फ्लोटिंग अर्थात बदलत्या व्याजदाराआधारे कर्ज तर दुसरे स्थिर व्याजदराचे कर्ज उपलब्ध आहे. फ्लोटिंग कर्ज 11.55 टक्के वार्षिक तर निश्चित व्याजदर 12.30 टक्के इतका आहे. हेल्थ केअर लोन ही योजना त्या ग्राहकांसाठी आहे, ज्यांच्या उपचारांचा खर्च हा मंजूर विमा रक्कमेपेक्षा अधिक आहे. बँकेने महिलांसाठी बचत खाते, कॅनेरा एंजल पण सादर केले आहे. यामध्ये अगोदरच मजूंर व्यक्तिगत कर्ज, ऑनलाईन कर्ज यासह इतर अनेक सुविधा देण्यात येतील.
महिलांना होईल फायदा
महिलांसाठी बचत खाते उघडण्याची प्रक्रिया नि:शुल्क आहे. सध्या महिला ग्राहक या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे खाते या नवीन पर्यायात हस्तांतरीत करु शकतात. बँकेने कॅनेरा युपीआय 123पे एएसआई आणि बँकिंग कर्मचाऱ्यांसाठी कॅनेरा एचआरएमएस मोबाईल ॲप सादर केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवोन्मेष केंद्राच्या मदतीने बचत गटांसाठी (SHGs) अविरत डिजिटल सेवा देणारी सहयोग करणारी ही पहिली बँक ठरली आहे.