अल्पावधित 10 हजाराचे 17 हजार झाले, कोरोनाकाळातही लोकांनी तुफान पैसा कमावला, तुमच्यासाठी खास आयडिया

| Updated on: Apr 03, 2021 | 11:43 AM

देशभरात कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, अनेक कंपन्या बंद पडल्या. मात्र दुसरीकडे शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market) करणाऱ्यांसाठी मागील वर्ष काहीसं चांगलं ठरलं.

अल्पावधित 10 हजाराचे 17 हजार झाले, कोरोनाकाळातही लोकांनी तुफान पैसा कमावला, तुमच्यासाठी खास आयडिया
money
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, अनेक कंपन्या बंद पडल्या. मात्र दुसरीकडे शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market) करणाऱ्यांसाठी मागील वर्ष काहीसं चांगलं ठरलं. गेल्या वर्षी शेअर बाजारातील (Bombay Stock exchange) गुंतवणूकदारांनी दमदार कमाई केली. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्ये (Nifty) ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांचे 10 हजार रुपयांचे 17100 रुपये झाले.

खरंतर कोरोना काळ हा शेअर मार्केटसाठी सुकाळ होता. आर्थिक वर्ष 2020-21 हे भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील एक उत्तम वर्ष होतं. गेल्या वर्षभरात सेन्सेक्स 68 टक्क्यांनी वधारला. तर निफ्टी 71 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे साहजिकच ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचे त्याच पटीने वाढले. आता नवं आर्थिक वर्ष 2021-22 ची सुरुवातही जोरदार झाली आहे.

जाणकारांचं म्हणणं काय?

मार्केट एक्स्पर्ट्सच्या मते, शेअर बाजारमध्ये प्रमुख शेअर्समध्ये जवळपास दहा टक्क्यांनी वाढ होऊ शकते. कोरोनाकाळातून उभारी मिळणे आणि जगभरातील अर्थचक्र पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी मागील वर्षासह हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे.

पुढेही तेजीची शक्यता 

ट्रेड स्वीफ्टचे डायरेक्टर संदीप जैन यांच्या मते, “चालू आर्थिक वर्षात निफ्टी 16,000-16,500 च्या आसपास राहील, तर सेन्सेक्स 55,000-56,000 च्या आसपास राहू शकतो. जवळपास दहा टक्क्यांची तेजी पाहायला मिळू शकते. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात BSE 2020-21 च्या शेवटच्या सत्रात 49,509.15 अंकांवर बंद झाला. हाच निर्देशांक मागील वर्षी म्हणजे 31 मार्च 2020 रोजी 29,468 अंकांवर बंद झाला होता. त्यामुळे वर्षभरातील फरक दिसून येतो. हा फरक तब्बल 68 टक्क्यांचा आहे.

वर्षभरात 71 टक्क्यांची उसळी

राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात NSE 31 मार्च 2021 रोजी 14,690.70 अंकांवर बंद झाला. त्याआधीच्या वर्षात म्हणजे 31 मार्च 2020 रोजी हाच निर्देशांक 8,597 अंकांवर बंद झाला होता. त्यामुळे निफ्टीमध्ये एका वर्षाद तब्बल 70.88 अंकांनी उसळी पाहायला मिळाली.

आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी दराचं आशादायक चित्र दिसलं. त्याचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या सत्रातही चांगले आकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एप्रिल-मे महिन्यात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञ संदीप जैन यांनी व्यक्त केला आहे.

(During corona period last year investor get good returns from Share market BSE and NSE)

संबंधित बातम्या 

मोठी बातमी! आता Post Office मधून पैसे काढणं महागणार, 1 एप्रिलपासून नवा नियम लागू

बँकांमध्ये पैसे जमा करणे आता फायदेशीर नाही, वाढण्याऐवजी होतायत कमी, जाणून घ्या…