नवी दिल्ली : या सणासुदीत (Festive Seasons) ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठी उलाढाल केली आणि जोरदार कमाई केली. भारतीयांनी यंदा ऑनलाईन खरेदीवर (Online Shopping) जोर दिल्याचे दिसून येते. या सणासुदीत ई-कॉमर्स (E-Commerce) कंपन्यांच्या एकूण विक्रीत 25 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे कंपन्यांनीच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली आहे..
बाजारातील संशोधन कंपनी रेडसीस स्ट्रॅटर्जी कन्सलटन्सीने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, यंदा भारतीयांनी सणासुदीच्या काळात तब्बल 76 हजार कोटी रुपायांची खरेदी केली.
रेडसीसचे उज्ज्वल चौधरी यांच्या दाव्यानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांनी यंदा अपेक्षेप्रमाणे जोरदार व्यवसाय केला. यंदा या कंपन्यांच्या एकूण विक्रीत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपन्यांची कामगिरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य आहे.
रेडसीसने ई-कॉमर्स कंपन्या 83,000 कोटींचा व्यवसाय करतील, असा अंदाज गृहित धरला होता. पण नंतर कंपनीने हा अंदाज 8-9 टक्क्यांनी घटविला. पण एकंदरीतच ई-कॉमर्स कंपन्यांचे प्रदर्शन जोरदार राहीले आहे.
यंदाच्या फेसिव्ह सीझनमध्ये कंपन्यांनी 76,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. हा आकडा जोरदार आहे. एका वर्षातील विक्रीचे एकूण आकडे पाहता, कंपन्यांच्या विक्रीत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.
या अहवालानुसार, ई-कॉमर्समध्ये फ्लिपकार्ट कंपनीच दादा ठरली आहे. या कंपनीचा मार्केट शेअर 62 टक्के म्हणजे जवळपास 40 हजार कोटी रुपयांचा आहे. फ्लिपकार्टमध्ये फ्लिपकार्ट व्यतिरिक्त Myntra, Shopsy हे प्लॅटफॉर्मही आहेत.
फॅशन सेगमेंटमध्ये एका वर्षात 32 टक्के, मोबाईल विक्रीत 7 टक्के, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 13 टक्के, तर इतर सेगमेंटमध्ये 86 टक्क्यांची विक्री झाली आहे. ऑनलाईन शॉपर्स बेसमध्ये 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. निमशहरी भागातील ग्राहकांनी अधिक खरेदी केली आहे. हा आकडा 64 टक्के आहे.